Kolhapur vidhansabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Vidhansabha Election: कोल्हापुरात मुश्रीफ, माने, महाडिकांनी आघाडीला टाकले मागे! निकाल नव्हे तर...

Ashokrao Mane highest campaign spender Kolhapur district: प्रचाराच्या निमित्ताने आतापर्यंत जिल्ह्यात प्रचार खर्चाच्या बाबतीत महायुतीचे नेतेच सर्वाधिक पुढे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रचारात सर्वाधिक खर्च केलेले हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अशोकराव माने हे आहेत

Rahul Gadkar

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीचे मतदान चारच दिवसावर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात प्रचाराची लगबग वाढली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून प्रचाराचे फंडे वापरले जात आहेत. प्रचार फेरी, रोड शो, गाव भेटी असे प्रचाराचे फंडे वापरत 'मिसळ पे चर्चा' याचे देखील आयोजन उमेदवारांकडून सुरू आहे. प्रचाराच्या अनुषंगाने उमेदवारांकडून प्रत्येक गोष्टीवर पैशांची खैरात सुरू आहे.

प्रचाराच्या निमित्ताने आतापर्यंत जिल्ह्यात प्रचार खर्चाच्या बाबतीत महायुतीचे नेतेच सर्वाधिक पुढे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रचारात सर्वाधिक खर्च केलेले हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अशोकराव माने हे आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांचा सर्वाधिक 17 लाख 41 हजार 455 रुपये खर्च झाला आहे.

माने यांच्यापाठोपाठ कागल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी आतापर्यंत 15 लाख 54 हजार 848 इतका खर्च केला आहे. त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा 14 लाख 70 हजार 444 इतका प्रचारार्थ खर्च केला आहे.

चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा 13 लाख 14 हजार 58 रुपये इतका आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती मधील शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा 14 लाख 94 हजार 138, तर करवीरचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांचा 14 लाख 23 हजार 416 रुपये खर्च झाला आहे.

प्रचारार्थ खर्च करणाऱ्या उमेदवारांवर जिल्ह्यातील निवडणूक विभागाचे बारीक लक्ष आहे. निवडणूक पथकाकडून उमेदवाराच्या प्रचारार्थ राबवण्यात आलेल्या यंत्रणेचा तपशीलवार खर्चाची नोंद करून घेतली जात आहे. त्यासंदर्भातील दैनंदिन आढावा निवडणूक विभागाकडे देण्यात येत आहे. तर काही उमेदवारांकडून खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे दिला जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून खर्च ग्राह्य धरला आहे. खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांसाठी खर्च मर्यादा 40 लाखांपर्यंत देण्यात आली आहे. उमेदवारांकडून सादर केलेला खर्च व निवडणूक विभागाच्या नोंदवहीतील खर्च याचा ताळमेळ बसतो का? याची शहानिशा केली जाणार आहे.

इतर उमेदवारांचा खर्च किती?

राधानगरी

  • प्रकाश आबिटकर - १०,३३,३४५ रुपये

  • के. पी. पाटील - १०,८१,५६२

  • ए. वाय. पाटील - ५,०२,५५९

चंदगड

  • शिवाजीराव पाटील - ५,०८,७७३

  • राजेश पाटील - ४,९८,३८९

  • नंदिनी बाभूळकर- ४,७०,६५३

  • अप्पी पाटील - ४,८६,५३४

करवीर

  • चंद्रदीप नरके - ८,८६,४७८

  • संताजी घोरपडे - ६,८३,००७

कागल

  • समरजितसिंह घाटगे - ६,२७,४१४

कोल्हापूर उत्तर

  • राजेश लाटकर- ४,७६,४८९

शाहूवाडी

  • विनय कोरे - ६,५१,८६६

  • सत्यजित पाटील-सरुडकर- ३,६०,८००

इचलकरंजी

  • राहुल आवाडे - १०,३९,६३७

  • मदन कारंडे - ४,०८, २६४

हातकणंगले

  • राजू आवळे- ७,१४,५००

  • सुजित मिणचेकर - ३,९१,३१०

शिरोळ

  • राजेंद्र पाटील-यड्रावकर - ७,८५,८८४

  • गणपतराव पाटील - ४,४३,७६५

  • उल्हास पाटील - ४, १९,४२१

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT