Solapur, 16 November : ‘बटेंगे तो कटेंगे’ हे महाराष्ट्रात चालणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात असली गोष्ट खपवून घेणार नाही. मी अल्पसंख्याकांच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. मी यावेळी सोशल इंजिनिअरिंग केलं आहे. आम्हाला मिळालेल्या 60 जगापैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या आहेत. विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला संधी दिली, काँग्रेसनेही केले नाही, ते मी केले आहे, त्यामुळे सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील (Mohol Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले, ही निवडणूक आपल्या सर्वांच्या भवितव्याची आहे. अर्थसंकल्प मांडला. योजना चांगल्या झाल्या आणि पाऊसकाळही चांगला झाला आहे. पण लोकसभेत कांदा निर्यात बंदीमुळे फटका बसला, 400 पार घोषणेच्या फेक नरेटिव्हमुळे पराभव झाला.
आम्ही प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी संविधान भवन बांधणार आहोत. संविधान फार महत्वाचे आहे. त्याचा आदर आपण आजही करतोय, उद्याही करणार आहेत. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत संविधान असेल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मुस्लिम बांधवांमध्ये CAA कायद्यावरून गैरसमज करून दिला आहे. तुम्हाला आता गोळा करून पाकिस्तान आणि बंगलादेशाला पाठवणार आहेत, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. मी यावेळी सोशल इंजिनियरिंग केलं आहे. विधान परिषदेत अल्पसंख्याक समाजाला एकही जागा नव्हती, त्यामुळे मी लगेच इद्रिस नायकवाडी यांना आमदार केले. काँग्रेसनेही केले नाही, ते मी केले, त्यामुळे सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका. मी 10 टक्के जागा महिला, मागासवर्गीय, आदिवासी समाजाला देऊन न्याय दिला आहे.
कोविड काळात मी सकाळी 8 वाजता मंत्रालयात जाऊन बसत होतो. मला काही मंत्री म्हणायचे की, दादा कशाला जाता, पटकन मरून जाल. अरे पण लोकांनी आपल्याला निवडून दिले आपण नाही मदत केली तर काय होणार. मंत्रालयात बसलो नाही तर मंत्रालय बंद पडेल, असे मी त्यांना सांगायचो, असे अजित पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.