Pandharpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी आज (ता. २७ जून) आपल्या हजारो समर्थकांसह भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी आपली भूमिका बदल्याचे समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय चौकट बाजूला सारून स्थानिक आघाडी करूनच सर्व निवडणुका लढवल्या जातील, अशी घोषणा भालके यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (As soon as KCR turned his back, Bhagirath Bhalke changed his political stance)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी भालके यांनी आपल्या भाषणात बीआरएस पक्षाचे गोडवे गायले होते. त्यावर तेलंगणातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या टाळ्याही मिळवल्या. (Bhagirath Bhalke News Update)
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे मंत्रिमंडळ हैदराबादकडे रवाना होताच भगीरथ भालके यांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन विठ्ठल परिवार किंवा आघाडीच्या माध्यमातून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या विधानानंतर भालके यांनी बीआरएस पक्षाचा झेंडा गुंडाळून ठेवला आहे, काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
भालके यांनी केसीआर जाताच घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे बीआरएस पक्षाचे वरिष्ठ नेतेही नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भालकेंच्या या संदिग्ध राजकीय भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आजच्या भालकेंच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने त्यांचीही चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.