BRS - K Chandrashekhar Rao Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR On Maharashtra Tour : पुष्पवृष्टीची परवानगी नाकारली; 'केसीआर' एकटेच घेणार दर्शन, 'असा' असणार दिनक्रम

KCR In Pandharpur : केसीआर तुळजाभवानीचेही घेणार दर्शन

सरकारनामा ब्यूरो

KCR Ashadhi Darshan : तेलंगणानंतर महाराष्ट्रात अस्तित्व निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. आज एकदशीनिमित्त ते विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. ते आपल्या मंत्रिमंडळासह दर्शन घेणार होते. मंदिर प्रशासनाच्या वतीने मात्र फक्त केसीआर यांनांच व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, केसीआर पालखी आणि वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करणार होते. यास त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राज्यातील बीआरएसचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. (Latest Political News)

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी (ता. २६) हैदराबाद येथून आपल्या ६०० वाहनांच्या ताफ्यासह सोलापूरला दाखल झाले. ते मंत्रिमंडळासह आज विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेणार होते. मंदिर प्रशानाच्या वतीने मात्र सर्वांना परवानगी देण्यात आली नाही. व्हीआयपी म्हणून फक्त केसीआर यांना दर्शन घेता येणार आहे. ते आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मंदिरात जाऊन विठ्ठालाचे दर्शन घेणार आहे.

आज दोन्ही पालखी वाखरी येथे येणार मुक्कामी असणार आहे. यावेळी या दोन्ही पालखी आणि वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची परवानगी बीआरएसच्या वतीने मागण्यात आली होती. त्यास परवानगी मिळाली नाही. दरम्यान, एका राज्याच्या मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह ही पुष्पवृष्टी करणार असल्याने परवानगी मिळेल, अशी आशा बीआरएसच्या कार्यकर्त्यांना होती. आता परवानगी मिळाली नसल्याने राज्यातील बीआरएसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

केसीआर यांनी आपल्या बीआरएस पक्षाचे हातपाय पसरण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. या पक्षात राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. आज पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या केसीआर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

असा असणार केसीआर यांचा दिनक्रम

सकाळी साडेनऊ वाजता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

दहा वाजता केसीआर वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

साडेदहा वाजता भगिरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

दुपारी बारा वाजता भालके यांच्या निवासस्थानी भोजन

दुपीरी दीड वाजता केसीआर यांचा ताफा तुळजापूरकडे रवाना

साडेतीन वाजता तुळाजाभवानीचे दर्शन

साडेचार वाजता ते हैदराबादकडे रवाना होतील.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT