eknath shinde (4).jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे; विठुरायाकडे साकडं

Akshay Sabale

Ashadhi Wari 2024 : पंढरपुरात आज मोठ्या भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. अभ्यंग स्नानाने महापूजेचा प्रारंभ झाला. तर, मंत्रोपचारानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली.

यंदा नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासना या गावचे रहिवाशी बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. ते गेले 16 वर्षे झाले आषाढी वारी करून विठुराया चरणी लीन होतात.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाचे वारकरी म्हणून दर्शन रांगेतून शेतकरी भाविकाची निवड केली जाते. त्याच पद्धतीनं अहिरे दाम्पत्याची निवड करण्यात आली.

"वारकऱ्यांचे संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे, देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे," असं साकडं मुख्यमंत्री शिंदेंनी विठुरायाचरणी घातलं आहे.

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, "वारी हा आनंदचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या 30 टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे सरकार आपला कारभार करत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT