Prithviraj Chavan, Ashok Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan Resignation : राजीनामा अशोक चव्हाणांचा अन् शोध पृथ्वीराज चव्हाणांचा

Prithviraj Chavan and Balasaheb Thorat : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरातांवर निष्ठावंतांच्या नजरा

Vishal Patil

Karad Political News :

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूंकप झाला. राज्यात आणि देशात या बातमीने खळबळ उडाली. त्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक घडामोड घडत होती.

काँग्रेसला लागलेली घरघर काही थांबत नाही. त्यात निष्ठांवत म्हटले जाणाऱ्या अशोक चव्हाणांची भर पडल्याने दिवसभर चव्हाणांना फोन येत होते पण ते पृथ्वीराज चव्हाणांना येत. आणि त्यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात होता.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसजन आणि माध्यमांचे प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना सतत फोन करत होते. सगळेजण पृथ्वीराज बाबांचा शोध घेत होते. याला कारण होते यापुढे काँग्रेसची (Congress) भूमिका काय असेल आणि अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) राजीनाम्यावर पृथ्वीराज बाबांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन घणाणत होते.

पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते मुख्यमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. अत्यंत कुशल नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. पक्षातून डावलल्यानंतरही ते काँग्रेसच्या विचारधारेशी घट्ट आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया सर्वांसाठी महत्त्वाची होती. त्याचवेळी काँग्रेस पुन्हा या आश्वासक चेहऱ्याला डावलणार की जबाबदारी देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पृथ्वीराज चव्हाण काल त्यांच्या कराडमधील पाटण कॉलनीतील निवासस्थानी होती. अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली तसे पृथ्वीराज चव्हाणांच्या घरचे फोन खणाणू लागले. अगदी दिल्लीपासून कराडपर्यंतचा सर्व मीडिया पृथ्वीराज चव्हाणांचा शोध घेत होती. फोन माहिती घेतल्यानंतरही काही स्थानिक प्रतिनिधी निवासस्थानी येवून खातरजमा करत होते.

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पृथ्वीराज चव्हाण काल एकत्र येत अशोक चव्हाण राजीनाम्याबाबत चर्चा करत होते. मूळचे काँग्रेस निष्ठावंत म्हणून आता या दोन्ही नेत्यांकडे पक्षाने धुरा देण्याची गरज असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहेत. मात्र, सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीच्या काळातही झालेल्या राजकारणामुळे मामा-भाचे दोघेही दुखावले होते. त्यानंतर पक्षाकडून अनेक जबाबदाऱ्या देताना पृथ्वीराज चव्हाणांना डावलले गेल्याचे दिसले. आता काँग्रेसला धक्का बसल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे निष्ठावंत नेते पुन्हा चर्चेत आले आहेत.

'जनतेकडे न्याय मागणार'

जे घडत आहे ते कशामुळे ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. भाजपमध्ये आज निवडणुकीला सामोरे जायचे धाडस नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचे विभाजन करून आपल्याला काही संधी मिळते का? त्याचा प्रयत्न चाललेला आहे. नेतेमंडळी जरी गेले तरी त्यांना मते देणारे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वासामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकीला ते जेव्हा सामोरे जातील तेव्हा त्यांचे खरे चित्र दिसेल, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

आम्ही आणि आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत. अशोक चव्हाण यांनी जो दुर्देवी निर्णय घेतला आहे. त्याबद्दल खंत व्यक्त करतो. ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा करतो. त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना कशाची भीती होती तेच याबाबत सांगू शकतील. पण काँग्रेस पक्ष मजबुतीने राजकीय आव्हानाला सामोरे जाणार आहे, काँग्रेस पक्ष हा जनतेमध्ये न्याय मागायला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT