Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा राजीनामा; तर प्रज्ञा सातवांचंही ठरलं, नेमकं काय म्हणाल्या?

Pradnya Satav : 'जिसे मुरझाने का खौफ नहीं है, मैं उस गुल के साथ खडी हूँ'
Rahul Gandhi, Pradnya Satav
Rahul Gandhi, Pradnya SatavSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress Politics : भाजपमधील प्रवेशाच्या चर्चा या अफवा असल्याचे वारंवार सांगितल्यानंतर अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला. आता ते भाजपमध्येच दाखल होण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. दरम्यान त्यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. आमदारकी आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी आपापली मते व्यक्त केली. यात विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातवांचे ट्विट लक्ष वेधून घेत आहे.

सध्या काँग्रसचा (Congress) पडता काळ असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. या पडत्या काळातच पक्षातील मोठे नेते पक्ष सोडत असल्याने काँग्रेसला आगामी निवडणुका ताकदीने लढवणे जिक्रीचे होण्याची शक्यता आहे. यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनीही आक्रमक विधान केले आहे.

Rahul Gandhi, Pradnya Satav
Ashok Chavan : गेल्या वर्षीची अफवा, यंदा खरी ठरली; भाजपबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?

यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडली. मात्र राहिलेल्यांनी ताकदीने निवडणुका लढवल्या आणि सत्ता खेचून आणली. तेच यंदाही होणार आहे, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला. यातच प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी आम्ही राहुल गांधीसोबत कायम राहणार असल्याचे सांगत आम्हाला संपण्याची भीती नाही, असे विधान केले आहे.

Rahul Gandhi, Pradnya Satav
Eknath Shinde : चर्चा तर होणारच! गणपतराव गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर भाजप-शिंदे गटाचे पुन्हा एकत्र बॅनर

प्रज्ञा सातव यांनी हिंदीतून चार ओळी लिहीत करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत दिवंगत खासदार राजीव सातव फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या म्हणाल्या, 'जिसे मुरझाने का खौफ नहीं है, मैं उस गुल के साथ खडी हूँ । कैसा भी दौर आये लेकीन, मैं राहुल जी के साथ खडी हूँ,' असे आमदार सातव यांनी आपण काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आगामी निवडणुका ताकदीने जिंकण्यासाठीच लढण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

दरम्यान, खुद्द अशोक चव्हाणांनी ट्विट करत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस पक्षात भूकंप झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने दिल्ली गाठली.

यानंतर त्यांनी ट्विट करून अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्यावर सूचक विधान करून भाजपवर घणाघात केला. तसेच माजी मुख्यमंत्री विलास देशमुखांचे विधान ट्विट करून जे काँग्रेस संपवायला गेले, तेच संपले असा सूचक इशाराही दिला. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Gandhi, Pradnya Satav
Ashok Chavan : जिकडे अशोक चव्हाण, तिकडे समर्थक आमदार? नांदेड काँग्रेसची वाट बिकट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com