Ashok Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan: काँग्रेसकडे नेतृत्व नाही, भविष्याचा विचार करून मोठे नेते सोडताहेत पक्ष; अशोक चव्हाण यांनी डागली तोफ

BJP MP Ashok Chavan visits Sai Samadhi at Shirdi: माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

विधानसभा निवडणुकीनंतर गलितगात्र झालेल्या काँग्रेसवर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी तोफ डागली आहे. 'मी पन्नास वर्षे काँग्रेस पक्षात होतो. त्यामुळे त्या पक्षावर टीका करणे योग्य नाही. मात्र, काँग्रेस पक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये दिशाहीन झालेला दिसतो. कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व नाही. त्यामुळे मातब्बर नेते आणि कार्यकर्ते आपल्या भवितव्याचा विचार करून काँग्रेस पक्ष सोडीत आहेत', असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

अशोक चव्हाण यांनी सपत्नीक शिर्डी येथे साई समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत कन्या आमदार श्रीजया चव्हाण होत्या. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साई मंदिर विभागप्रमुख विष्णुपंत थोरात, विनायक देशमुख व सार्थक करमासे आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना अशोक चव्हाण यांनी तोफ डागली. 'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे नवीन आहेत. त्यामुळे राजकारणात आणि त्यांच्या पक्षात कोण कुणाला गिळेल, हे त्यांच्या लक्षात येणार नाही. एकेकाळी काँग्रेस पक्षात बाहेरचे नेते येत असत. हे येणे-जाणे सुरूच असते. मात्र, लोकांसोबत संपर्क तुटला की पक्ष दिशाहीन होतो. दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष टिकून आहेत, कारण त्यांचा लोकांसोबत संपर्क आहे', असे निरीक्षण अशोक चव्हाण यांनी नोंदवले.

पहलागाम दहशतवादी हल्ल्यावर बोलताना, पाकिस्तानच्या कारवायांविरोधात त्या-त्या वेळच्या पंतप्रधानांनी योग्य ती पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाकिस्तानचे पाणी बंद करून मोठे पाऊल उचलले. पाकिस्तान शरण येईल, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यावर कुणीही उठसूट भाष्य करणे योग्य नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

शेतकरी कर्जमाफीकडे दुर्लक्ष नाही

महायुती सरकारने कर्जमाफी देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. आता माहिती सरकार त्यावरून शब्द फिरवत आहे. यावर बोलताना, अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सोडून दिलेला नाही. सध्या राज्याच्या तिजोरीवर ताण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे सांगितले आहे. पुढील वर्षभरात आर्थिक स्थिती सुधारली की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार ते होऊ शकतो. राज्यातील महायुतीकडे मोठे बहुमत आहे. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT