
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढवा आहे. रशियानंतर आता जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि जपानने संरक्षणमक्षी नाकातानी यांच्यात एक महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत पहलगाममधील झालेला दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा झाली आहे. जपानचे सरंक्षणमंत्री जनरल नाकातानीसान यांनी आपण भारतासमोर असल्याचे सांगितले आहे.
जागतिक स्तरावर मोठी शक्ती समजल्या जात असलेल्या रशियाने सोमवारी भारताला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट फोनवरुन संपर्क साधला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत देशाला संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचे पुतीन यांनी सांगितले. त्यानंतर जपानने पाठिंबा दिला आहे.
दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी भूमिका पुतीन यांनी स्पष्ट केली. दहशतवाद तसेच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक घेण्यात आली. बैठकीत संभाव्यपणे दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली आहे. यूएनमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी यूनएससीच्या बैठकीत जे पाहिजे होते, ते मिळाले असं विधान केले. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू काश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली. बैठकीत सुरक्षा परिषदेने भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असा प्रयत्न पाकिस्तानचा होता. ही बैठक UNSC च्या चेंबरमध्ये नाही तर कंसल्टेशन रुममध्ये आयोजित करण्यात आली होती.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर सलाल बागलीहार आणि किशनगंगा धरणांमध्ये पाणी रोखले आहे. त्याचा दूरगामी परिणाम तर पाकिस्तानावर होणारच आहे पण त्याआधी एकट्या चिनाब नदीचा प्रवाह भारताने रोखून धरल्या बरोबर पाकिस्तानातल्या खरीप हंगामाला 21 % पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा पाकिस्तानी इंडस रिव्हर सिस्टीम ऍथॉरिटीने दिला. सिंधू, सतलज, रावी आणि झेलम या मोठ्या नद्यांचे प्रवाह भारताने वेगवेगळ्या वेळी रोखले, तर पाकिस्तानात कसा हाहाकार माजेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.