snhehlata kolhe- Asjotosh kale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar Politics: आशुतोष काळे सक्रिय झाले अन् स्नेहलता कोल्हेंचे टेन्शन वाढले

Ashitosh Kale : राजकीय विरोधक भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचीही या कार्यक्रम आणि बैठकीस उपस्थिती होती.

सरकारनामा ब्यूरो

Nagar Politics : उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झालेल्या आमदारांना पदे मिळाल्यानंतर ते विविध शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावताना आहेत. मात्र यामुळे अशा मतदारसंघातील माजी लोकप्रतिनिधीं वा 2024 विधानसभेसाठी असलेल्या इच्छुकांमध्ये मात्र चलबिचल असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या बंडखोरीत त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील पारनेरचे आ.निलेश लंके, नगरचे आ.संग्राम जगताप, अकोल्याचे आ.किरण लहामटे आणि कोपरगावचे आ.आशुतोष काळे या चार आमदारही सामील झाले. त्यानंतर आता आमदार काळे आणि संग्राम जगताप हे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री विखेंसोबत बैठकांमध्ये दिसून येत आहेत. यात आशुतोष काळे यांची नजरेत भरणारी सक्रियता ही भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंसाठी गटासाठी चलबिचल करणारी आहे.

नुकताच देश पातळीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलेल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमात तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीस काळेंनी उपस्थिती लावत विविध सूचना केल्या. विशेष म्हणजे त्यांच्या राजकीय विरोधक भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचीही या कार्यक्रम आणि बैठकीस उपस्थिती होती.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने थोरात-कोल्हे गट विखेंच्या विरोधात आला. ही थोरात-कोल्हे 'युती' निवडणुकी नंतर गणेश कारखान्याच्या संचालक सत्कार, ऊस विकास मिळावा, मिल रोलर पूजन आदी कार्यक्रमातून दिसून येत असून गणेश कारखान्याचा ऊस कोणीही पळवू नये असा इशारा देत 3.25 लाख मेट्रिक टन ऊसाच्या गाळपाचे लक्ष पूर्ण करणार असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी दिला आहे. हे सर्व कार्यक्रम युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले आहेत.

दुसरीकडे विखेंनीही या 'युती' वर नाव न घेताअनेकदा सूचक वक्तव्येही केली. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात आ.आशुतोष काळे यांचे महायुतीच्या कार्यक्रमात अधीकची सक्रियता चर्चेत असून ही कोल्हेंसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत काही महत्वपूर्ण राजकीय घडामोडीं शक्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT