Mahayuti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti : मोठी बातमी! महायुतीचा प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच खोडा, कोल्हापूरमधील सभा रद्द

Mahayuti Kolhapur Meeting Cancelled : महायुती आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातील तपोवन मैदान येथून सुरुवात होणार होता. यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता होती.

Rahul Gadkar

Mahayuti News : आगामी विधानसभा निवडणूक भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीत एकत्र लढणार आहेत. महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन मंगळवारी (ता.20) तपोवन मैदान येथे फोडण्यात येणार होता.

महायुतीच्या या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र हा मेळावाच रद्द करण्यात आला आहे.

महायुती आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातील तपोवन मैदान येथून सुरुवात होणार होता. यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता होती. यासाठी तपोवन मैदान येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. सभा मंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे.

जवळपास जिल्हाभरातून 40 ते 50 हजार लाभार्थ्यांसह कार्यकर्त्यांचा मेळावा येथे पार पडणार होता. आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून या मेळाव्याच्या तयारीत होते. मात्र, अचानक हा मेळावा रद्द करण्यात आला. मंगळवारी होणार मेळावा रद्द केला असला पुढील तारीख लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

त्रिदेव अजिंक्य, शहरात पोस्टरबाजी

मंगळवार (ता.20) होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरभरात पोस्टर लावले होते. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात आला होता. या फोटो खाली 'त्रिदेव अजिंक्य' असे कॅप्शन देत मेळाव्याकडे लक्ष वेधून घेण्यात येत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT