BJP Victory's Celebration
BJP Victory's Celebration Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Elections Results 2023 : तीन राज्यांतील भाजप विजयाचे माण-खटावमध्ये सेलिब्रेशन..!; जयकुमार गोरेंनी वाटले पेढे

विशाल गुंजवटे

Maan political news : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रभर जल्लोष सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही भारतीय जनता पक्ष विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटत विजयाचा जल्लोष साजरा केला. (BJP's victory in three states celebration in Maan-Khatav..!)

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना अपेक्षितपणे भाजपने तीन राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवले आहे. माण तालुक्यातील आपल्या निवासस्थानी भाजपचे आमदार जयकुमार गोरे सकाळपासून जनतेच्या समस्या सोडवत असताना त्यांचे मोबाईलवरून या निकालावरही लक्ष होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला तीन राज्यांत स्पष्ट बहुमत मिळताच त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी अब की बार मोदी सरकार, भारतीय जनता पार्टी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार जयकुमार गोरेंच्या नावाने घोषणा देत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

तीनही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. हा करिश्मा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आहे, असे आमदार जयकुमार गोरे यांनी विजयानंतर सांगितले.

गोरेंनी प्रचार केलेले मध्य प्रदेशातील उमेदवारही जिंकले

भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे मध्यलप्रदेश विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील मतदारसंघात बाइक रॅली काढत प्रचार केला होता. त्याठिकाणचे भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

या प्रसंगी भाजपचे नेते अर्जुन काळे, दादासाहेब काळे, बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, हरिभाऊ जगदाळे, नवनाथ शिंगाडे आदींसह प्रमुख पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, चेअरमन कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT