Raipur News : जिंकता येऊ शकणारे छत्तीसगड राज्य काँग्रेसने गमावले आहे. राज्याची सत्ता जाण्याबरोबरच काँग्रेसला छत्तीसगडमध्ये अनेक धक्के बसले आहेत. जवळपास सहा मंत्री पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. तसेच, स्वातंत्र्यापासून (दोन वेळचा अपवाद वगळता) पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या सीतापूरमध्येही काँग्रेसचे मंत्री अमरजित भगत यांचा पराभव झाला आहे. भाजपने काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून मतदारसंघावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच झेंडा फडकवला आहे. (BJP's Ramkumar Toppo won for first time in Sitapur constituency in Chhattisgarh)
छत्तीसगडमधील सीतापूर या मतदार संघावर काँग्रेसचे दोन निवडणुका वगळता स्वातंत्र्यापासून वर्चस्व होते. मात्र, 2023 च्या निवडणुकीत भाजपचे नवखे उमेदवार माजी सैनिक रामकुमार टोप्पो यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते, भूपेश बघेल, सरकारमधील अन्नमंत्री अमरजित भगत यांचा तब्बल 17000 मतांनी पराभव करत प्रथमच सीतापूर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व निर्माण केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सीतापूर मतदारसंघावर 1952 पासून 1985 पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले होते. 1990 आणि 1998 चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसचे सातत्याने वर्चस्व राहिलेले आहे. या दोन निवडणुकीतही अपक्षाने बाजी मारली होती. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी 75 वर्षे वाट पाहवी लागली आहे.
विधानसभेच्या 1990 च्या निवडणुकीत मात्र अपक्षाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या तीन वर्षांच्या म्हणजेच 1993 च्या निवडणुकीत पुन्हा ही जागा काँग्रेसने जिंकली. मात्र, 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष गोपाल राम यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला.
अमरजित भगत हे 2003 पासून सीतापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ते सलग वीस वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. मात्र, 2023 च्या निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नवख्या उमेदवाराने पराभव केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे रामकुमार टोप्पो हे सीतापूर मतदारसंघातून 17000 मतांनी निवडून आले. त्यांनी मंत्री भगत यांचा पराभव केला आहे. टोप्पो यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच सीतापूर मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.