Sangali Politics: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Politics: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sangali Loksabha News: सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला.

Mangesh Mahale

Sangali News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच प्रचारात काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. सांगली लोकसभेत प्रचारासाठी (Sangalli lok Sabha news) जात असताना एका माजी आमदाराच्या गाडीवर हल्ला झाल्याची मााहिती समोर येत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. माजी आमदार विलासराव जगताप ( Vilasrao Jagtap) यांच्या गाडीवर दोन ते तीन जणांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणी विलासराव जगताप यांनी जत पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये, यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा आरोप जगताप करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपाचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांना हा हल्ला केल्या असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत काही दिवसापूर्वी जगतार यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ मी फुलवले. पक्षाची ताकद वाढविली. याची दखल न घेता वरिष्ठ पातळीवर पक्ष आमच्या विरोधात गट निर्माण करत आहे. अशी तीव्र भावना व्यक्त करत विलासराव जगतापांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांना साथ दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT