Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Corridor MIDC : विरोधकांकडून लोकांना भडकविण्याचा प्रयत्न... रामराजेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो

पिंपोडे बुद्रुक : कॉरिडॉरला कोरेगावची जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनीच दिले आहे. म्हसवड लोकेशन केंद्रीय समितीने नाकारले आहे. उत्तर भागातील जागेचा नकाशा अंतिम नसताना विरोधकांनी गैरसमज निर्माण करून लोकांना भडकवण्याचे उद्योग बंद करावेत, असे मत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

नांदवळ (ता.कोरेगाव) येथे एनआयसीडीसी समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, लालासाहेब शिंदे, अशोकराव लेंभे, सतीश धुमाळ, नागेश जाधव, संजय साळुंखे, ललित मुळीक, संग्राम सोळसकर, दयाराम सोळसकर, मनोज अनपट, दीपक पिसाळ उपस्थित होते.

तुम्ही विरोध केला तरी उद्योगपतींना हिच जागा हवी आहे, कारण महामार्ग व रेल्वे जवळ आहे. म्हसवडला कोण जाणार, असा प्रश्न करून रामराजे म्हणाले, सहा गावात रेडिरेकनरच्या चार ते पाच पटीने मोबदला मिळू शकतो. जागेचा नकाशा जिल्हा RDC ने केलेला असून तो फायनल नाही. अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत.

मी ११ धरणे बांधून २७ हजार प्रकल्पग्रस्त स्थलांतरित केले. तेव्हा माणचे आमदार कुठे होते, असा प्रश्न उपस्थित करून रामराजे म्हणाले, मी म्हसवडचे नुकसान करत नाही. आधीच्या राज्य सरकारने म्हसवडला प्राधान्य दिले होते. तेव्हा उत्तर कोरेगावला राज्याची एमआयडीसी द्या, असे मी अजितदादांना सांगितले होते.

आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की, औद्योगिक कॉरिडॉरला कोरेगावची जागा देऊ. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्हाला म्हसवडला कॉरिडॉर करायचा असेल तर आम्हाला राज्याची अडीच-तीन हजार एकराची एमआयडीसी द्या. मात्र, कॉरिडॉर झाला तर एक लाख लोक कामाला लागतील. म्हसवडला झाला तर तो यशस्वी होणार नाही. झाला तर कोरेगावलाच होईल. लोकांनी साथ दिली तर सरकारवर अवलंबून न राहता खासगी एमआयडीसी करू. त्यासाठी आपल्याला दबाव गट करावा लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT