म्हसवड 'एमआयडीसी'ला माझा विरोध कधीच नव्हता : रामराजे

Ramraje Naik Nimbalkar : आता उत्तर कोरेगावातील काहींचा एमआयडीसीला विरोध होत आहे.
Ramraje Naik Nimbalkar Latest News
Ramraje Naik Nimbalkar Latest Newssarkarnama
Published on
Updated on

सातारा : केंद्रातील मागील सरकारने एमआयडीसी मंजूर करताना म्हसवडची अधिसूचना काढली होती. त्यावेळीही मी विरोध केलेला नव्हता व आताही माझा म्हसवड एमआयडीसीला (MIDC) माझा विरोध नाही, असे स्पष्ट मत माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik NImbalkar) यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, उत्तर कोरेगाव हा दुष्काळी भाग असून तेथील शेतीला उद्योग, नोकरी, व्यवसायाची जोड मिळाली तर लोक चांगल्या प्रकारे जीवन व्यथित करु शकतात, ही माझी सुचना होती. हेच काम मी फलटणमध्ये केलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Ramraje Naik Nimbalkar Latest News)

Ramraje Naik Nimbalkar Latest News
डॉल्बीच्या तालावर थिरकत उदयनराजेंनी उडवली कॉलर

बंगळूर मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून उत्तर कोरेगाव परिसरातील चार, सहा गावांत एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे सांगून रामराजे म्हणाले की, ही निवड दिल्लीतील सरकारने केलेली आहे. उत्तर कोरेगाव हा दुष्काळी भाग असून तेथील शेतीला उद्योग, नोकरी, व्यवसायाची साथ मिळाली तर लोक चांगल्या प्रकारे जीवन व्यथित करु शकतात ही माझी सुचना होती. हेच काम मी फलटणमध्ये केलेले आहे. तेथील एमआयडीसीत आज दहा हजार युवक नोकरी करत आहेत.

Ramraje Naik Nimbalkar Latest News
भाजपच्या लोकसभेच्या तयारीत प्रदेश उपाध्यक्षांनाच वगळले; समर्थकांमध्ये नाराजी

आता उत्तर कोरेगावातील काहींचा एमआयडीसीला विरोध होत आहे. मुळात दुसऱ्या मतदारसंघातील आमदाराकडे जाऊन विरोध दाखवणे म्हणजे एमआयडीसी म्हसवडला जाईल,असे म्हणणे चुकीचे असून सुशिक्षित माणसाकडून हे अपेक्षित नाही. एमआयडीसी कोठे करायची ही निवड दिल्लीतील सरकारने केलेली आहे. रामराजेंनी केलेली नाही. आता विरोध केला तर एमआयडीसी दुसरीकडे जाईल, असे काही लोकांना वाटत आहे. मुळात म्हसवडला एमआयडीसी होण्यास माझा विरोध नाही. म्हसवडची अधिसूचना केंद्रातील मागील सरकारने काढली होती. त्यावेळीही मी चुकूनही म्हसवडला विरोध केला नव्हता. मी जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळीच तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण एमआयडीसी होऊन देत, असे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com