अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी आज ( मंगळवारी ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात कर्जत, अकोले व पारनेर नगरपंचायतचा समावेश आहे. या तीनही तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीने पणाला लावली आहे. यात भाजपचे राम शिंदे ( Ram Shinde ), मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ), वैभव पिचड ( Vaibhav Pichad ), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), किरण लहामटे, नीलेश लंके ( Nilesh Lanke ), शिवसेनेचे विजय औटी ( Vijay Auti ) यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. बुधवारी ( ता. 19 ) तीनही ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. Attention to the voting in the villages of Rohit Pawar-Ram Shinde, Pichad, Lanke, Auti
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या पेचामुळे ही निवडणूक दोन टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 13 तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी चार प्रभागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्याच्यावेळी मोठी रणधुमाळी पहायला मिळाली. कर्जतमध्ये भाजपने दहशतीचे राजकारण हा विषय प्रचाराचा मुद्दाच बनविला. पारनेरमध्ये स्थानिक व परका हा प्रचाराचा मुद्दा झाला. अकोल्यात पिचड व लहामटे यांच्यात वैयक्तिक टीका टिपण्णीला महत्त्व आले.
कर्जतमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज माघारी घेतल्याने माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांवर दडपशाहीचा आरोप केला. तसेच ग्रामदैवत असलेल्या गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते. दुसऱ्या टप्प्यात मात्र कर्जतमध्ये दडपशाही हा शब्दही ऐकू आला नाही. पारनेर व कर्जतमध्ये दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गाठीभेटी व प्रचार फेऱ्यांवरच जोर देण्यात आला. अकोले शहरात मात्र स्थानिक नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या आणि गाजविल्याही.
या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य मतदारराजा आजज (मंगळवारी) मतदार यंत्रात बंद करणार आहे. तत्पूर्वी आजचा रात्र या राजकीय कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची आहे.
भाऊबंदकीचा राजकीय 'धुमाकूळ'
अकोले नगरपंचायत निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात पिचड व लहामटे यांचे आरोप प्रत्यारोप जेवढे चर्चेचा विषय ठरले नाहीत त्या पेक्षाही दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सभांतून शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ व भाजपचे शिवाजी धुमाळ यांच्यातील वैयक्तिक आरोप प्रत्यारोप गाजले. शिवाजी धुमाळ हे पूर्वी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष होते तर मच्छिंद्र धुमाळ हे शिवसेनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष आहेत. या दोघांनी आरोपाची पातळी वैयक्तिक स्वरुपात आणली त्यामुळे प्रचारापेक्षा या दोघांतील भाऊबंदकीचा वादच चर्चेचा विषय ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.