डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांनी अकोले शहरात प्रचार सभा घेतली.
प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे

प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे

सरकारनामा

Published on
Updated on

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगरपंचायतीची उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत कालच संपली. त्यामुळे शहरातील 13 ही प्रभागांतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज ( मंगळवारी ) एकादशीचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ वाढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांनी अकोले शहरात प्रचार सभा घेतली. Dr. Kiran Lahamate said, give power, see development...

अगस्ती मंदिर परिसरात राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांचा प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक भांगरे, शिवसेनेचे मारुती मेंगळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी व 13 उमेदवार उपस्थित होते. महेश नवले यांनी प्रास्तविक केले. या प्रसंगी 13 उमेदवारांनी आपला परिचय व प्रभाग सांगितला.

<div class="paragraphs"><p>प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे</p></div>
`त्या` प्रकाराबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी माफी मागावी

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, अकोले नगरपंचायत वर राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता येणार आहे. अकोले शहराच्या विकासासाठी पाच वर्षात निधी न मिळाल्याने विकास ठप्प झाला आहे. सत्ता द्या विकास पहा, असे आवाहन आमदार डॉ. लहामटे यांनी मतदारांना केले.

सीताराम गायकर यांनी सांगितले की, आम्ही 40 वर्षे त्यांच्यासोबत होतो मात्र अकोले शहराचा विकास झाला नाही. मग आता ते काय विकास करणार? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकोले येथे 18 डिसेंबरला आल्यावर अकोले शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करू. विरोधकांनी आमचे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला. एका उमेदवाराला चार तास आम्ही सांभाळले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे आदेश गायकर यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना दिले.

<div class="paragraphs"><p>प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे</p></div>
भाजपकडून उमेदवारीची आशा संपल्यावर डाॅ. किरण लहामटे अखेर राष्ट्रवादीत दाखल

शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी अकोले नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता येणे निश्चित आहे. ज्यांना उमेदवार टिकवता येत नाही त्यांनी आपला पराभव मान्य करावा, अशी कोपरखळी मारली. सुरेश खांडगे यांनी आभार मानले. अपक्ष उमेदवार प्रकाश नाईकवाडी यांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com