Dilip sopal-baban shinde
Dilip sopal-baban shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बबनदादा-सोपलांना निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश : सत्ताधारी-बचाव समिती आमने-सामने

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (Dudh pandhari) संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्याचे नवे श्रेष्ठी आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) व माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांना अपयश आले आहे. दूध संघासाठी आता सत्ताधारी संचालकांचे महाविकास पॅनेल विरुध्द दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध संघ बचाव कृती समितीचे पॅनल आमने-सामने आले आहे. 17 पैकी 1 जागा बिनविरोध झाली असून 16 जागांसाठी निवडणूक लागली आहे. सत्ताधारी पॅनेलला कपबशी; तर बचाव समितीला रोडरोलरचे चिन्ह मिळाले आहे. (Baban Shinde, Dilip Sopal fail to unopposed election of Solapur District Dudh Sangh )

सुमारे 316 मतदार असलेल्या दूध संघासाठी 26 फेब्रुवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार आहे. 27 फेब्रुवारीला दूध संघाची मतमोजणी होणार आहे. आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका रश्‍मी बागल, शेकापचे चंद्रकांत देशमुख यांनी एकत्रित येत बिनविरोधसाठी प्रयत्न केले होते.

दूध संघ बचाव कृती समितीसोबतची चर्चा अपयशी ठरल्याने समितीने या निवडणुकीतून 11 उमेदवार दिले आहेत. दूध संघ बचाव समितीने क्रियाशिल मतदार संघातील 7, महिला मतदार संघातील दोन, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघात एक, भटक्‍या जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील 1 असे 11 जागांवर उमेदवार दिले आहेत. राषट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भरणा असलेल्या सत्ताधारी पॅनेलमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनबाई वैशाली जितेंद्र साठे यांना उमेदवारी मिळाली नाही. सत्ताधारी पॅनेलच्या विरोधातील दूध संघ बचाव कृती समितीची उमेदवारी स्वीकारली आहे.

अशा होणार लढती

क्रियाशिल संस्था सभासद मतदार संघ : 12 जागा

* सत्ताधारी पॅनेल : बबनराव अवताडे, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औंदुबंर वाडदेकर, रणजितसिंह शिंदे, वैशाली शेंबडे, योगेश सोपल.

* दूध संघ बचाव कृती समिती : अनिल अवताडे, सुवर्णा इंगळे, कांचन घाटगे, भाऊसाहेब धावणे, पार्वतीबाई पाटील, संजय पोतदार, सुनीता शिंदे.

* इतर : सारिका पाटील

.........................................................................

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1 जागा

सत्ताधारी पॅनेल : जयंत साळे

दूध संघ बचाव कृती समिती : मंगल केंगार

...........................................................................

भटक्‍या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ : 1 जागा

सत्ताधारी पॅनेल : राजेंद्रसिंह पाटील

दूध संघ बचाव कृती समिती : रमजान नदाफ

.....................................................................

महिला प्रतिनिधी मतदार संघ : 2 जागा

सत्ताधारी पॅनेल : निर्मला काकडे, छाया ढेकणे.

दूध संघ बचाव कृती समिती : वैशाली साठे, संगीता लोंढे

इतर : सारिका पाटील, सरस्वस्ती भोसले, सुनीता शिंदे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT