राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या सूनबाई महाआघाडीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात!

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सूनबाई वैशाली जितेंद्र साठे यांना महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून उमेदवारी मिळाली नाही.
 Vaishali Sathe-Baliram Sathe
Vaishali Sathe-Baliram SatheSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी, Dudh Pandhari) संचालक मंडळाची निवडणूक आता स्पष्ट झाली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), शिवसेना, कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेत्यांनी एकत्रित येत सोलापूर जिल्हा दूध संघासाठी महाविकास आघाडीचे पॅनेल तयार केले आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram sathe) यांच्या सूनबाई वैशाली जितेंद्र साठे यांना महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी विरोधातील दूध संघ बचाव कृती समितीची उमेदवारी स्वीकारली आहे. (Dudh Pandhari Election : Solapur NCP president's daughter-in-law Dudh Sangh Bachao Samiti candidate)

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित केलेल्या पॅनेलला कपबशी, तर दूध संघ बचाव समितीला रोडरोलरचे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप आज (ता. १६ फेब्रुवारी) झाले आहे. दूध संघाच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे.

 Vaishali Sathe-Baliram Sathe
पवारांनी विचारले; दोघेही राजकारण करता, तर मग घर कोण सांभाळतं?

महिला प्रतिनिधी मतदार संघातील दोन जागांसाठी मंगळवेढा तालुक्‍यातील निर्मला काकडे आणि बार्शी तालुक्‍यातील धामणगाव येथील छाया ढेकणे यांना महाविकास आघाडीच्या पॅनेलची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या विरोधात दूध संघ बचाव समितीने करमाळा तालुक्‍यातील केम येथील संगीता लोंढे, तर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा येथील वैशाली जितेंद्र साठे यांना उमेदवारी दिली आहे. साठे या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सूनबाई आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी विरोधात जाऊन निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्या दूध संघ बचाव कृती समितीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

 Vaishali Sathe-Baliram Sathe
उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने मतदान घेतले; पण माजी संचालकाच्या वडिलाने थोरातांना धारेवर धरलेच!

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या 17 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. संघाचे विद्यमान संचालक दीपक माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरीत 16 जागांसाठी निवडणूक लागली आहे. दूध संघ बचाव समितीने क्रियाशिल मतदार संघातील 7, महिला मतदार संघातील दोन, अनुसुचित जाती/जमाती मतदार संघात एक, भटक्‍या जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील 1 अशा 11 जागांवर उमेदवार दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com