Bachchu Kadu On Sugar Factory :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bachchhu Kadu On Sugar Factory : ऊस कारखानदारांना दणका देण्यासाठी आता बच्चू कडू नगरच्या साखरपट्ट्यात...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : ऊस दरावरून एकूणच राज्यात खासकरून साखर पट्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. टनाला किमान 3 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी आज केली गेली. या मागणीसाठी स्वाभिमानीसह बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आता नगरच्या साखरपट्यात आंदोलनासाठी उतरला असल्याने, ऊस दर आंदोलन आता कोल्हापूरनंतर नगर जिल्ह्यात तीव्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील उस दर प्रश्नावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रहारचे जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची कुरळपूर्णा अचलपूर येथे भेट घेतली आहे.

यावेळी बच्चू कडू यांनी प्रहार संघटना सदैव ऊस उत्पादकांच्या सोबत असून, ऊस दर प्रश्नावर वेळ प्रसंगी मी स्वतः अहमदनगरच्या आंदोलनात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर जिल्ह्यात केवळ दोन-तीन साखर कारखान्यांनी भाव जाहीर केले असून, बाकी साखर कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावेत, त्यासाठी प्रहारने दि. २१ रोजी सर्व साखर कारखान्यांचे प्रमुखांची साखर आयुक्तांसमवेत बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिल्ह्यात समान उस दर जाहीर होणे अपेक्षित आहे. अन्यथा मी स्वतः तेथील उस दर आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.

या भेटीदरम्यान प्रहारचे जिल्हा प्रमुख अभिजित पोटे यांनी, नेवासा तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी, तसेच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगर येथे दगडखान जागेत प्रस्तावित असलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून भटक्या विमुक्त जाती जमाती साठी मोफत घरकुल योजना, श्रीरामपुर तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी आरक्षित केलेल्या टाकळीभान टेल टँक गेट नूतनीकरण आणि जिल्हयातील दुध भेसळ प्रश्न आदी विषयांवर बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.

जिल्ह्यात या पूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर जिल्ह्यात शेवगाव सह इतर तालुक्यात आंदोलन तीव्र केले असून ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या अडवल्या जात आहेत. यातून पोलिसांबरोबर अनेक ठिकाणी वादावादी सुरू असून, सरकार पोलिसांच्या मदतीने आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप होत आहे. साखर कारखानदारांनी किमान टनाला 3 हजार रुपये घोषित करत अगोदर आपापला ऊस दर घोषित करावा, म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस कोणत्या साखर कारखान्याला द्यायचा याचा निर्णय घेऊ शकेल, अशी मुख्य मागणी आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT