Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna
Raju Shetty, Awabhimani Shetkari SanghtnaSarkarnama

Swabhimani Shetkari Saghtana : ऊसदरासाठी आता 'स्वाभिमानी'ने उपसले चक्काजाम आंदोलनाचे अस्त्र!

Sugarcane FRP Protest : तिसऱ्या बैठकीतही तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना आक्रमक, आंदोलन पुन्हा चिघळणार
Published on

Kolhapur News : ऊसदराबाबत कोल्हापुरात आज पार पडलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ ठरली. बैठकीच्या सुरुवातीसच गोंधळ पाहायला मिळाला, मात्र नंतर बैठक सुरू होऊनही अखेरपर्यंत तोडगा निघाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetty, Awabhimani Shetkari Sanghtna
Sugarcane FRP Protest : ऊसदराबाबत आयोजित कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत गोंधळ!

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता १९ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे.

चारशे रुपये देण्यास कारखानदारांची नकारघंटा आहे, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील 400 रुपयांसाठी कमिटी नेमण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, गेल्या वर्षीच्या 400 रुपयांसाठी कमिटी नेमण्याचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धुडकावला आहे. परिणामी कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत ऊसदराचे आंदोलन पुन्हा चिघळणार असल्याचे दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com