Bachchu Kadu Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bachchu Kadu Breaking : बच्चू कडूंचा विधानसभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला, फडणवीसांच्या 'गुडबुक'मधल्या आमदारांविरोधातच लढणार

Bachchu Kadu Announcement Of First Candidate For Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघातून प्रहारकडून आपला उमेदवार मैदानात उतरविला होता. गेल्या सहा महिन्यात त्यांनी बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात विधाने केली आहेत.

Deepak Kulkarni

Satara News : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे.त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात दंड थोपटलं आहे.

कधी इशारा तर कधी कानपिचक्या देत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळी चूल मांडण्याचेही संकेत दिले आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी पहिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.कडू यांनी सातारा जिल्ह्यातील माण खटावमधून अरविंद पिसे यांना उमेदवारी घोषित केली आहे. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या'गुडबुक'मधील आमदार आणि नेत्याविरोधातच पिसे यांना मैदानात उतरवण्याचं धाडस आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दाखवलं आहे.सातारा जिल्ह्यातील माण खटावमध्ये सध्या भाजपचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत.

बच्चू कडू यांची प्रहार संघटना,संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष,रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. बच्चू कडू व संभाजी राजे हे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघातून प्रहारकडून आपला उमेदवार मैदानात उतरविला होता. गेल्या सहा महिन्यात त्यांनी बच्चू कडू यांनी महायुतीच्या विरोधात विधाने केली आहेत. त्यामुळे ते महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडतील, अशी परिस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT