Abhijit Wanjarri
Abhijit Wanjarri sarkarnama

Video Congress Politics : क्राॅस वोटिंग करणाऱ्या आमदारांचे टेन्शन वाढले, नावं जाहीर करत निलंबन होणार!

MLC Election Congress cross voting : क्राॅस वोटिंग करणाऱ्या सातही आमदारांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले जाणार आहे. त्यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार आम्ही शोधून ठेवले आहेत, असे अभिजीत वंजारी यांनी सांगितले.
Published on

Congress Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहेत. याच आठवड्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. निलंबन होताना त्यांची नावे समजतील, असा दावा विधान परिषदेची काँग्रेसचे प्रतोद आणि निवडणूक प्रतिनिधी अभिजित वंजारी यांनी केला आहे.

काही आमदार गद्दारी करणार याची शंका आधीच आम्हाला होती. त्यानुसार ट्रॅप लावण्यात आला होता. कोणाला कोणी मतदान करायचे, प्राधान्यक्रम कसा द्यायचा हे निश्चित करण्यात आले होते, असे वंजारी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 30 मते तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना सात मते काँग्रेसने द्यायची असे ठरले होते. प्रत्यक्षात सातव यांना 25 मते पडली. त्यांची एकूण पाच व नार्वेकर यांची दोन मते फुटली. त्यावरून सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे स्पष्ट होते. याचा अहवाल तत्काळ पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. हे सात आमदार कोण आहेत, कुठल्या विभागातील आहेत हे सांगण्यास वंजारी यांनी नकार दिला.

Abhijit Wanjarri
Sharad Pawar On OBC : शरद पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लक्ष !

ते आमदार कोण? ते सांगण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे. निलंबनाच्या आदेशानंतर त्यांची नावे सर्वांच्या समोर येणार असल्याचे वंजारी यांनी सांगितले. सातही आमदारांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले जाणार आहे. त्यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार आम्ही शोधून ठेवले आहेत. आमचे नेते चंद्रकांत हांडोरे हेसुद्धा बहुमत असताना पराभूत झाले होते. त्यामुळे पक्षाने यावेळी आधीच खबरदारी घेतली होती, असा दावा वंजारी यांनी केला.

काँग्रेस आता पूर्वी सारखी राहिली नाही. पक्षाचा आदेशाचे उल्लंघन केले तरी काही फरक पडत नाही, असा समज करून घेणाऱ्यांना पक्षाने धडा शिकवायचा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वांचीसुद्धा हीच इच्छा आहे. पक्षाने उमेदवारी द्यायची, आमदार, मंत्री कराचये आणि यांनी मात्र गद्दारी करायची हे कोणीच खपवून घेणार नाही.

आमचे कार्यकर्ते पक्षासाठी मरमर काम करतात. उमेदवारांना निवडूण आणातात. मात्र काही आमदार याचा फायदा घेतात हे आता चालणार नाही, असे वंजारी यांनी ठणकावले. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. याचा अर्थ पक्षासोबत कोणी बेईमानी करावी, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे असा होत नसल्याचेही अभिजित वंजारी यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Abhijit Wanjarri
Mohan Hambarde : ‘क्रॉस व्होटिंग’बाबत संशयाची सुई वळताच मोहन हंबर्डेंनी घेतली ‘तो मी नव्हेच’ची भूमिका; म्हणाले, अशोक चव्हाणांचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com