Bajirao Khade.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bajirao Khade On Congress: शरद पवार गटात पाऊल ठेवताच बाजीराव खाडेंनी काँग्रेसवर तोफ डागली

Bajirao Khade Join Sharad Pawar NCP : गेली अठ्ठावीस वर्षे बाजीराव खाडे हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. प्रियंका गांधी यांच्या टीममध्ये विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. इतके वर्ष एकनिष्ठ असूनही मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षातून सहा वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आणि काँग्रेसने उमेदवारी न दिल्यानंतर बंडखोरी केलेले काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी बुधवारी (ता.4) राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. या मेळाव्यानंतर बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचाल शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे स्पष्ट केले.

गेली अठ्ठावीस वर्षे बाजीराव खाडे हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. प्रियंका गांधी यांच्या टीममध्ये विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. इतके वर्ष एकनिष्ठ असूनही मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षातून सहा वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी अशी मागणी बाजीराव खाडे यांनी जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांच्याकडे केली होती.

मात्र, या मागणीची साधी दखल सुद्धा केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाने न घेतल्याने बाजीराव खाडे हे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात बंड केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार त्यांच्यावर सहा वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर आणि उमेदवारी डावल्यानंतर गेले 28 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असल्याने बाजीराव खाडे यांना जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अर्ज करतेवेळी अश्रू आनावर झाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील नेते देखील उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत बाजीराव खाडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

गेली 25 ते 30 वर्षे मी काँग्रेसमध्ये कार्य केले आहे. मुळात शेतकरी असल्याने महाराष्ट्रात आम्हाला राजकीय पाठबळ शरद पवार यांच्याकडून मिळेल अशी आशा आहे. शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करता येईल, हीच आशा ठेवून आपण शरद पवार गटात पक्षप्रवेश करत असल्याची माहिती बाजीराव खाडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT