Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेतून 'मुख्यमंत्री'च गायब; अजितदादांना फुल्ल 'क्रेडिट'?

Shivsena Vs NCP Ajit Pawar : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जाहिरातीत दादाचा वादा, अजितदादांची लाडकी बहीण योजना,माझ्या अजितदादाने पैसे पाठवले असे डायलॉग या योजनेसंदर्भात वापरल्याचे दिसून येत आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra
Ladli Behna Yojana MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती खडबडून जागी झाली आहे.त्याच पार्श्वभूमीवरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मध्य प्रदेशात गाजलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणली. या योजनेला मिळणारा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधी महाविकास आघाडीला धडकी भरवली आहे.

मात्र, असे असतानाच आता महायुतीत मात्र लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki Bahin Yojana) नवं महाभारत रंगण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 'लाडकी बहीण' योजनेतून मुख्यमंत्र्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवत 'फुल्ल क्रेडिट' अजितदादांनाच दिलं आहे.

महायुतीतील भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीनही पक्षांकडून लाडकी बहीण योजनेचा फायदा उचलण्यासाठी तिचं जोरदार मार्केटिंग सुरू आहे. यात अजित पवार गटाने इतर दोन घटक पक्षांपेक्षा जरा जास्तच ब्रँडिंग चालवलं आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती, सोशल मीडिया, जाहीर कार्यक्रम, यांसारख्या विविध पध्दतीने या योजनेचा फायदा उचलण्यासाठी कंबर कसली आहे. पण आता याच जाहिरातींमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने लाडकी बहीण योजनेचं नावच बदललं आहे. मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकल्यामुळे नवा वाद पेटला आहे. त्यावर शिवसेनेनं आक्षेप घेत तीव्र नाराजी दर्शवली आहे. अजित पवार गटाने या योजनेच्या जाहिरातीत ‘अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Ladli Behna Yojana Maharashtra
Sharad Pawar VIDEO : मुख्यमंत्रिपदाबाबत 'फॉर्म्युला'च शरद पवारांनी सांगून टाकला; दिला 1977 चा दाखला...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जाहिरातीत दादाचा वादा, अजितदादांची लाडकी बहीण योजना,माझ्या अजितदादाने पैसे पाठवले असे डायलॉग या योजनेसंदर्भात वापरल्याचे दिसून येत आहे.बँक खात्यात येणारे 1500 रुपयांची भेट नसून माझ्या दादाचं प्रेम आहे.ही दादांची लाडकी बहीण योजना आहे. आमच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख असून दादा तर एकच आहे अशा प्रकारच्या डायलॉगमुळे या जाहीरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या जाहिरातीवरुन निर्माण झालेल्या नव्या वादावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,अजितदादांना जर लाडकी बहीण योजनेचं खरंच श्रेय घ्यायचं असतं तर त्यांनी ही योजना ‘उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’या नावाने आणली असती. पण त्यांनी या योजनेला मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं.अजित पवारांच्या विचारांनीच या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

Ladli Behna Yojana Maharashtra
Vijay Wadettiwar : 'मविआ'चे सरकार असताना एसटी संप भडकवला; विजय वडेट्टीवारांनी टायमिंग साधलं

पाटील म्हणाले, अजित पवारांच्या मनात असा विचार आला नाही. श्रेय घेण्याचा विचार असता तर कदाचित त्यांनी त्या योजनेला महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं किवा स्वतःचं नाव सुध्दा दिलं असतं. परंतु,त्यांच्या मनात असा विचार आला नाही. आपल्या पक्षाने या योजनेचं नाव बदलेलं नाही.राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही योजना मांडली असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com