Shankarrao Gadakh
Shankarrao Gadakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब मुरकुटेंची गावातच झाली कोंडी : सेवा संस्थेत मंत्री गडाखांचा बोलबाला

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) - भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्या देवगावातून अनेकांनी हातात शिवबंधन बांधून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) गटात प्रवेश केला आहे. परिणामी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या गटाचा एकही अर्ज नसल्याने तालुक्यातील राजकारणासाठी हा मोठा भूकंप समजला जात आहे. ( Balasaheb Murkute's dilemma in the village itself: Minister Gadakh's sway in the service organization )

माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होवून भाजपच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन मंत्री गडाखांचे नेतृत्व मान्य केले आहे. तालुक्यात त्यांची राजकीय कोंडी सुरु असतानाच ते राहत असलेल्या देवगावात रोजच शिवसेना प्रवेशाचे फटाके फुटू लागले आहेत. मुरकुटे यांचे पुतणे पंचायत समिती सदस्य अजित मुरकटे यांच्या मागोमाग ग्रामपंचायत व सेवा संस्थेतील अनेक मोहरे गडाख गटात दाखल झाल्याने या राजकीय कलाटणीची गावागावात चर्चा सुरु झाली आहे.

सध्या तालुक्यात सेवा संस्था निवडणुकींचा धुराळा सुरु असुन मुरकुटे यांच्या ताब्यातील देवगाव सेवा संस्थेकरीता मंत्री गडाख गटाकडून 51 अर्ज दाखल झाले. माजी सरपंच अशोक पाडळे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पाडळे यांच्यासह अन्य चार जणांचे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज आहेत. माजी आमदार मुरकुटे गटाकडून एकही अर्ज दाखल नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ग्रामपंचायत रडारवर

मुरकुटे यांच्या गावची सोसायटी मंत्री गडाख गटाकडे जाणार असे चित्र असतानाच आज देवगावच्या विद्यमान उपसरपंच समीना पठाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन महिन्यांपूर्वी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य महेश निकम यांनी शिवबंधन बांधले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT