bandatatya karadkar- balasaheb patil
bandatatya karadkar- balasaheb patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब पाटील कराडकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

सरकारनामा ब्युरो

सातारा : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झो़ड उठली आहे. 'बंडातात्या कराडकर यांचा बोलविता धनी वेगळाच' असल्याची टीका हकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत कराडकर यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. दिवंगत नेते पंतगराव कदम यांचा मुलगा अभिजित कदम यांच्या अपघाती निधनानंतर आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या मुलाबद्दल देखील बंडातात्या कराडकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असल्याचा इशारा दिला आहे.

''वाईन विक्रीबाबत बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध होणारच. बंडातात्यांना माहिती आहे की मागील सात वर्षापासून माझा मुलगा पंढरीची वारी करतो, अस असतानाही त्यांनी माझ्या मुलाबाबतही दारू पिण्यावर बेताल वक्तव्य केले होते, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. याबाबत माझ्या मुलगा बंडातात्या कराडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असून त्यासंदर्भात निर्णय प्रक्रिया सुरू असल्याचं मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी वकिलांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण बंडातात्या कराडकर यांचा बोलवता दुसरा कोण तरी आहे,'' असल्याचे मतही बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. तर, दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

- बंडातात्या कराडकरांची जाहीर माफी

आपली वक्तव्ये अंगलट आल्याचे लक्षात येताच त्यांनी जाहीर माफीही मागितली. 'मी काही व्यक्तींची नावे घेतली होती. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही तसेच, मी त्यांचा द्वेषही करत नाही. राजकीय हेतूने मी आरोप केले नाहीत. मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझे विधान अनावधानाने झाले आहे. त्याबद्दल मी क्षमा मागतो. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडतील. आदेशप्रमाणे ते मला ताब्यात घेतील आणि आम्ही अटक करून घेऊ.

पण राज्य सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा आहे. या मतावर मी ठाम आहे. राजकीय नेत्यांच्या बोलण्यामागे राजकीय हेतू असतो. माझा तसा राजकीय हेतू नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. मी फक्त वाईनच्या निर्णयावर म्हण म्हटली होती. ढवळ्याशेजारी पवळा बांधला, असे मी म्हटले होते. राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझे अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढले. माझ्या 70 वर्षाच्या जीवनात माझा कधीच वाकडा पाय पडला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT