अहमदनगर - दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी प्रतिउत्तर दिले. यात त्यांनी ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील 10 वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे आमदार होते, असे म्हणत शेलकी शब्दात टीका केली होती. या टीकेला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना प्रतिउत्तर दिले. ( I went to see my father, so I didn't listen to Supriya Sule's speech )
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे या ज्येष्ठ खासदार आहेत. त्या बोलत होत्या त्यावेळी दुर्दैवाने मी बाहेर माझे वडील आले होते. त्यांना भेटायला गेलो होतो. त्या कालावधीत त्यांचे भाषण संपलं. मी काही ते भाषण पाहिले नाही पण निश्चित लोकसभेतील उत्तर-प्रतिउत्तर असते. ते लोकसभेत दिले पाहिजे. ते भाषण पाहून वेळ प्रसंगी मी त्या भाषणाचे संसदेत उत्तर देईल.
ते पुढे म्हणाले की, माझ्यावर टीका कोणीही करू शकतं. माझ्या वडिलांवर व पक्षावरही टीका होऊ शकते. तीन पक्ष एकत्र कसे आले यावरही चर्चा करायला भरपूर वाव आहे. आरोप-प्रत्यारोप होत राहतात. माझे म्हणणे आहे की, मी जे चार मुद्दे मांडले ते तुम्ही खोडून द्या. मी चुकीचे बोललो किंबहुना माझ्या वक्तव्यात कुठे तथ्य नव्हते, असेल तर माझ्या भाषणातील एक एक मुद्दा खोडून द्या. मी जमिनीवर काम करणारा आहे. मागील सहा महिन्यांतील अनुभवाचा व अभ्यास करून मी बोललो.
माझे म्हणणे आहे की ते योजनांचा लाभ घेत नाहीत, असे मी म्हणत नाही. मात्र महाविकास आघाडीचे खासदार त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रीय वयोश्री योजनेची शिबिरे घेतात. त्यावेळी त्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो लावला नाही. ते केंद्र सरकारवर टीका करतात. तेव्हा सांगा की विरोधीपक्ष असल्याने टीका करतो मात्र केंद्राच्या ज्या योजनांचा फायदा घेतो ते तरी भाषणात सांगा. मी म्हटले नाही की कोणी या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यांना गैरसमज निर्माण झाला आहे. त्यांनी भाषण काळजी पूर्वक एकावे.
केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले. त्यावेळी उत्तरप्रदेश, आसाम सारख्या राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले. जे पेट्रोल उत्तरप्रदेशात 95 रुपयांना मिळते तेच पेट्रोल मुंबईत 110 रुपयांना मिळते. महाराष्ट्र सरकारने तो निर्णय आर्थिक अडचणीमुळे घेतला नाही, हे मी समजू शकतो. मात्र तुम्ही दारूवरील उत्पादन शुल्क कमी करून टाकला. त्यांनी जो नवीन नियम काढला वाईन अल्कहोल नाही, याचे मला फार आश्चर्य वाटते. वाईनच्या बाटली मागे लिहिले आहे की ती आरोग्याला धोकादायक आहे. पेट्रोल पेक्षा दारुवरील कर कमी केला म्हणून मी गमतीने तो स्लोगन तयार केला की दारू प्या पण वाहन चालवू नका.
प्रत्येक अल्कहोल तयार करण्यासाठी एक्ट्रोन्युट्रल अल्कहोल ( ईएनए ) लागते. तो ग्रीन बेस्ट ( शेती उत्पादन पदार्थ ) असतो. तुम्ही तांदूळ, बीट पासूनही ते तयार करू शकतात. ते विदेशी लोकांना पिण्यासाठी वापरलं जातं. त्यापेक्षा एक करा सर्वच दारू किराणा दुकानात ठेऊन द्या, सगळ्यांचीच मजा. त्यांनाही सकाळी घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सींग करता येईल आणि जनतेची मजाच मजा. त्यांचे एकच उद्दिष्ट आहे की, जनतेला दारू देऊन नशेत ठेवायचं. धुंदीत ठेवायचं. त्यांचा भ्रष्टाचार जनतेला दिसू नये हा त्यांचा एकमेव उद्देश आहे, असा टोला डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.