Baramati Businessman Rana Dilip Suryawanshi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati Crime News : बारामती हादरली! बड्या उद्योजकावर प्राणघातक हल्ला, जखमी अवस्थेत पुण्यातील रुग्णालयात दाखल

Baramati Businessman Rana Dilip Suryawanshi Attack News : बारामतीमध्ये राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Baramati Crime News : बारामतीमध्ये राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बारामती विमानतळाजवळ रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात सूर्यवंशी जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती विमानतळाजवळ राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी यांनी पांढरा कुर्ता परिधान केला होता. हा कुर्ता रक्ताने माखलेला असल्याचे दिसून आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, तसेच या घटनेत किती जण सहभागी होते, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि घटनेमागील कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, घटनेनंतर रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमके वास्तव समोर येण्याची अपेक्षा आहे.

राणा सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वीही हल्ला?

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आधीच्या घटनेचा तपशील आणि त्या घटनेचा सध्याच्या हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आहेत आणि पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT