

Thane News : ठाण्याच्या मानपाड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ठाणे क्राइम ब्रँचनं या हत्येप्रकरणात शुक्रवारी(ता.9 ऑक्टोबर) सर्वात मोठी कारवाई करत मोठं यश मिळवलं आहे.
ठाणे क्राइम ब्रँचनं प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच्या एका अज्ञात आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं प्रयागराज येथे केलेली ही कारवाईनंतर आता पूर्णेकर हत्येप्रकरणी तपासाला वेग येणार आहे. कनोजिया हा या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणात आरोपी नितेश पवार याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी कर्नाळा येथून हस्तगत केली होती. खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीसह जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला होता. तसेच,या गुन्ह्यात आरोपीनं वापरलेली अल्टो कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आतापर्यंत सतीश ऊर्फ पप्या शिंदे , निखिल यादव,नितेश पवार ऊर्फ भावड्या यांना अटक केली होती. आता संतोष कनोजिया यालाही क्राइम ब्रँचन बेड्या ठोकल्यामुळे आता या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंडपर्यंत पोलिसांना पोहोचण्यास मदत होणार आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ विरोधकांकडून 9 ऑक्टोबरला ठाण्यात शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरेंची शिवसेना,मनसे,काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी झाली होती.
हा मोर्चा ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.ठाण्यातील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज माफियांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.