करमाळा (जि. सोलापूर) : बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आणि स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले (Manohar Bhosale) याला बार्शी च्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबतची माहिती संशयित आरोपी भोसले याचे वकील ॲड. रोहित गायकवाड यांनी दिली आहे. (Barshi court grants bail to Manohar Bhosale in rape case)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2003 सह महिला अत्याचार प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी मनोहर भोसले याचा यापूर्वी बार्शी सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. दोष आरोपपत्र दाखल केल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने मात्र मनोहर भोसले याला जामीन मंजूर केला आहे.
फिर्यादी महिलेच्या जिल्ह्यात प्रवेश न करणे, न्यायालयाला कळवल्याशिवाय पत्ता न बदलणे, पुराव्याच्या कामात हस्तक्षेप न करणे या अटींसह २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर भोसले याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. करमाळा आणि बारामती पोलिस ठाण्यात भोसले याच्याविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. त्यात बारामती पोलिसांनी भोसले याला अटक केली होती. तेथून करमाळा पोलिसांनी त्याला ता. १९ सप्टेंबर २०२१ रोजी बारामती पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक केली होती. दरम्यान करमाळा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर भोसलेच्या वतीने ॲड. गायकवाड यांनी बार्शी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
बार्शी न्यायालयाने त्याचा जमीन फेटाळला होता. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. भोसले हा गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने (अल्सर) त्रस्त होता. त्याच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमवारी (ता. २३ जानेवारी) युक्तिवाद झाला होता. त्यावर भोसले याचे वकील ॲड. गायकवाड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश जयंद्र जगदाळे यांनी जमीन मंजूर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.