-किरण बोळे
Phaltan BJP News : खासदार उदयनराजे हे नियमितपणे माझ्याशी बोलत असतात, त्यामुळे माझ्या व पक्षाबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाही, असे सांगत भाजपमध्ये तिकीट मागण्याचा अधिकार पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यालाही आहे. कारण तो पक्षाचे व समाजाचे काम करत असतो. त्यामुळे ज्यावेळी पक्षाकडून उमेदवारीचा निर्णय होतो, तेव्हा आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule फलटण Phaltan News येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. लोकसभेच्या जागांवर मित्रपक्षांनी दावा करणे, हे युतीच्या राजकारणामध्ये होत असते; परंतु, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली जागा कुणाला दिली जाईल, याबाबत चर्चा केली नाही.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमचे राज्यातील नेते तसेच केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. जो निर्णय होईल त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये किंतु. परंतु नसेल. बावनकुळे म्हणाले, 'कोण कुठे लढणार आहे, हे आम्हाला महत्त्वाचं नाही. आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत'.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मित्रपक्षांच्या उमेदवारांपाठीमागे भाजप पूर्ण ताकदीने उभा राहील, तर भाजपच्या उमेदवारांच्या मागे आमच्या महायुतीतील 11 पक्ष ताकदीने उभे राहतील, त्यामुळे आम्ही राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि त्यामध्ये नांदेडसह बारामतीचाही समावेश असेल,' असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.