Phaltan Political News : भाजप आमदाराकडून माजी जलसंपदामंत्र्यांची पोलखोल; म्हणाले...

Jaykumar Gore : फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सांगतात...
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Phaltan BJP News : भाजपच्या वतीने सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय २०२४ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. फलटण येथे त्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी माजी जलसंपदा मंत्र्यांवर निशाणा साधला.

फलटण येथे "महाविजय २०२४; संपर्क से समर्थन" या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी माजी जलसंपदामंत्र्यांवर टीका केली.

आमदार गोरे म्हणाले, फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सांगतात; जलसंपदा विभागामध्ये असणारी जी माहिती आहे ती सांगून खासदाराला कशाला शहाणे करता ? त्यामुळे आम्ही काय केलं असे आता सर्वसामान्य नागरिक विचारात आहे; असे प्रश्न फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना करत आहेत; असा आरोप त्यांनी केला.

आमदार गोरे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी "मिशन 45" भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही फलटणमधून जाते; लाखो वारकरी ह्या मार्गावरून हजारो वर्षे जात आहे. यापूर्वी स्वतःला जाणते राजे म्हणवून घेणारे बारामतीकर कधीही वारकरी बांधवांचे दुःख समजू शकले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

MLA Jaykumar Gore
Satara Political News : अजित पवारांची ‘दादागिरी’ रोखण्यासाठी भाजपचे उदयनराजे ‘कार्ड’..

ते दुःख नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांना कळले. निरा - देवधर धरण बांधून झालं परंतु काही भागाला पाणी वळवण्यासाठी निरा - देवधरचे पुढील कालव्याचे कामकाज प्रलंबित ठेवले. फलटणसह माढा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्याचे काम खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे, असे मत व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

Edited By : Umesh Bambare

MLA Jaykumar Gore
Maratha vs OBC : तुम्ही काय संस्कार शिकवणार?; जरांगेंनी उडवली भुजबळांची खिल्ली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com