अहमदनगर - जलसंपदा विभागाच्या कुकडी प्रकल्पाचे आवर्तन लवकर सोडावे या मागणीसाठी कर्जतमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी तर पारनेरमध्ये शिवबा संघटनेने आंदोलनाची तयारी केली. मात्र आंदोलनापूर्वीच काल ( मंगळवारी ) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांची भेट कुकडी आवर्तना बाबत मागणी केली. त्यानुसार जयंत पाटील यांनी आश्वासन दिले. ( Before Ram Shinde's agitation, Rohit Pawar and Nilesh Lanka got assurance from Jayant Patil )
कुकडी प्रकल्पाच्या बैठकीत 25 मार्चला आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुकडी प्रकल्पाचा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत व श्रीगोंदे तालुक्याला लाभ होतो. यातील पारनेर व कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या दोन्ही तालुक्यांतून कुकडीचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी जोर धरत आहे. यातच राम शिंदे यांनी आज कर्जतमध्ये आंदोलनाची तरी केली. तर शिवबा संघटनेनेही उद्या ( गुरुवारी ) पारनेर तालुक्यात रस्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या ( गुरुवारी ) पारनेर तालुक्यात येणार आहेत.
मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी आमदार रोहित पवार व नीलेश लंके मुंबईत आहेत. त्यांनी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांना कुकडी प्रकल्पामुळे पिकांच्या नुकसानी विषयी माहिती दिली. तसेच 18 मार्चपूर्वी आवर्तन सोडण्याची मागणी केली. त्यानुसार जयंत पाटील यांनी 18 मार्चपूर्वी आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आगामी आठवड्याभरात कुकडीच्या कॅनॉलला पाणी येणार आहे.
राम शिंदेंचे आंदोलन सुरू
माजी मंत्री राम शिंदे यांनी कुकडी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी आज कर्जतमध्ये मोर्चा काढला तसेच आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत.
कुकडीचे पाणी 18 मार्चला सोडण्याचे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले असल्याचे समजते. आमच्या आंदोलनाचा धसका घेऊनच हा निर्णय झाला आहे. मात्र 18 मार्च हा दिवसही खूप लांब आहे. आवर्तन सुटल्यावरही ते पाणी कर्जतसह अहमदनगर जिल्ह्यात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे पिके पाण्याअभावी जळतील. कुकडीचे आवर्तन आजच सोडावे अशी आमची मागणी आहे.
- सचिन पोटरे, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस, भाजप.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.