Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke Will Join BRS : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; भगीरथ भालके २७ जूनला BRSमध्ये प्रवेश करणार

अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींना अखेर मूर्त रूप आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Politic's : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर मोठा धक्का बसला आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी आपण २७ जून रोजी भारत राष्ट्र समिती (बीएसआर) या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींना अखेर मूर्त रूप आले आहे. (Bhagirath Bhalke will join BRS on June 27)

पंढरपूर (Pandharpur) येथील भालके समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनंतर भगीरथ भालके यांनी ही माहिती दिली. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या बीआरएस प्रवेशामुळे राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी पोटनिवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेतली आहेत. त्यामुळे भालके यांच्या पक्ष सोडण्याचे परिणाम पंढरपुरात आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठविले होते, त्या विमानाने जाऊन भालके यांनी केसीआर यांची हैदराबाद येथे जाऊन केली हेाती. त्यानंतर भालके यांच्या बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता बळावली होती. आज भालके यांनी अधिकृत बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 27 जून रोजी पंढरपूरला येणार आहेत. या दरम्यान सकाळी सरकोली येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT