Bhanudas murkute
Bhanudas murkute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhanudas Murkute : दिवाळीनंतरही घुमणार मुरकुटेंच्या फटाक्याचा आवाज

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Bhanudas Murkute : रस्त्यांच्या प्रश्नावरून माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांनी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. अवैध वाळू, मुरमाच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत थेट मतदार संघात आमदार, खासदार आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच दुरुस्तीची कामे विना विलंब सुरू करावीत, अन्यथा जनआंदोलनाचा दिलेल्या इशारामुळे मुरकुटेंच्या फटाक्याचा आवाज दिवाळीनंतरही घुमणार हे नक्की.

नगर-मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक कोल्हार-बेलापूर-देवळाली-राहुरी फॅक्टरी मार्गे जाणार होती. या विरोधात आमदार लहू कानडे यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत ही वाहतूक बाभळेश्वर-श्रीरामपूर-नेवासे मार्गे वळविण्याच्य सूचना केल्या होत्या. तसेच वेळप्रसंगी आंदोलनाचाही इशारा दिला होता. यानंतर सदरची वाहतूक बाभळेश्वर-नेवासे मार्गे वळविण्यात आली. यासाठी वाहतूक पोलिसांनाही सूचना करण्यात आल्या होत्या.

चौकाचौकात फलक ही लावण्यात आले. आता माजी आमदार मुरकुटे यांनी यात उडी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून या प्रस्तावालाही विरोध दर्शविला. तसेच सदरची वाहतूक गंगापूर-वैजापूर-येवला अशी वळविणे सोयीस्कर असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदरचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यामुळे आता नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक गंगापूर-वैजापूर-येवला अशी वळविण्यात येणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले आहे. वाहतूक मार्गात बदल झाल्याने पुणतांबा-श्रीरामपूर-बेलापूर-राहुरी फॅक्टरी व श्रीरामपूर-नेवासा मार्गे या रस्त्याची होणारी हानी टळणार आहे.

मुरकुटे यांनी मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुर्दशा अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू व मुरमाच्या वाहतुकीमुळे झाली असून हे आमदार, खासदारांना दिसत नाही का, या अवैध वाळू उपसा व वाहतुकीस कोणाची आशीर्वाद आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला आमदार, खासदार आहेत की नाही अशी स्थिती असल्याचा आरोप केला आहे. तसेच मतदार संघातील दुर्दशा झालेल्या ग्रामीण भागातील अंतर्गत वाहतुकीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे विनाविलंब सुरू करावीत, अन्यथा याप्रश्नी दिवाळीनंतर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा मुरकुटे यांनी दिला आहे. एकंदरीत दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुरकुटे यांनी फोडलेल्या फटाक्यांचा आवाज दिवाळीनंतरही घुमणार आहे हे निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT