Shrirampur News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhanudas Murkute : विखे, थोरातांच्या कारखान्यांना क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते? मुरकुटे संतापले

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

Nagar: श्रीरामपूर कार्यक्षेत्रात ऊस नसताना गाळप क्षमता वाढीस तसेच एकीकडे दारु निर्मितीला परवाना दिला जात नसताना दारुनिर्मिती प्रकल्पाच्या क्षमता वाढीला परवानगी दिली जाते. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप श्रीरामपूर मधील अशोक कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.

अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताचा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बीआरएसचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, गंगापूरचे माजी आमदार आण्णासाहेब माने, भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले, कामगार नेते अविनाश आपटे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भानुदास मुरकुटे म्हणाले, "कार्यक्षेत्रात गळीत क्षमतेएवढा ऊस नसताना 20 हजार मेट्रिक टन प्रतीदिन क्षमता असणाऱ्या अंबालिका, बारामती, मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कारखान्यांना गाळप क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते?, सत्तेवर, मंत्रीपदावर असताना नियम बाजूला ठेवून जादा क्षमतेचे कारखाने उभे केले. सत्तेच्या जोरावर विखे व थोरात हे इतर कारखान्यांचे लचके तोडतात".

1969 नंतर साखर कारखान्यांना दारूनिर्मितीचे परवाने दिले गेले नाही. त्यामुळे दारूनिर्मिती तसेच महसूल खात्याचा महसूल मिळत असल्याने ते भाव देवू शकतात. आपल्याकडे दोन्हीही नसल्याने त्यांच्या इतका भाव देवू शकत नाही. आता उसाची टंचाई भासणार असून हे कारखाने आपल्या कार्यक्षेत्रात येवून ऊस पळवतील, अशी भितीही मुरकुटे यांनी व्यक्त केली.

'आम्ही ताजा उसाचे गाळप करतो. कार्यक्षेत्राबाहेरील व शिळ्या ऊसाचे गाळप करूनही यांची रिकव्हरी जादा कशी हे कोणी तपासणार की नाही? मंत्रिपदावेळी मी कोणावर अन्याय करणार नाही. कोणाला दोष लावणार नाही, अशी शपथ घेता. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर अन्याय करायला सुरू करतात. आपल्यालाही बेत पाहण्याचा योग येईल. वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणार. जे होईल ते पाहून घेवू', असे म्हणत उसावरून होणाऱ्या आगामी संघर्षासाठी भानुदास मुरकुटे यांनी आतापासून दंड थोपटायला सुरवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT