Ratnagiri News : कोकणात सध्या ऑपरेश टायगरची हवा जोरदार आहे. ही फक्त हवाच राहिलेली नसून एका प्रकारे वादळ निर्माण झाले आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला खिंडार पडताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसापासून येथे लागलेली शिवसेनेची गळती काही थांबलेली नाही. अशातच आता भास्कर जाधव यांच्या घरातीलच व्यक्तीने त्यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे भास्कर जाधव यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का काहीच महिन्यांपूर्वी बसला होता. माजी आमदार राजन साळवी यांच्याबरोबर शेकडो शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. हा सिलसिला सध्या सुरूच आहे. आता माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील शिवसेनेत दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात असून तसे संकेतच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
दरम्यान विद्यमान आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक देखील शिंदे गटात सामील होतील असा गौप्यस्फोट मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. पण या शक्यता भास्कर जाधव यांनी फेटाळत लावत आपण नाराज असल्याचे कबूल केले होते. तर आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहू, पक्षाची ताकद वाढवू असे म्हटले होते.
पण आता त्यांचीच कोकणात आणि जिल्ह्यात असणारी ताकद कमी झाली आहे. भास्कर जाधव यांचे चुलत भाऊ बाळाशेठ जाधवांनी शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. यामुळे कोकणात भास्कर जाधव यांना सगळ्यात मोठा धक्का बसल्याचे बोलले जातेय. बाळाशेठ जाधवांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.
दापोली नगरपंचायतीमधील उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटातील 14 जणांचा एकत्र गट स्थापन करत शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. सत्ताधारी 14 नगर सेवकांनी युवा नेते असलेल्या शिवानी खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भास्कर जाधव यांचे चुलत भाऊ बाळाशेठ जाधवांचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.