Bhaskar Jadhav News : कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी आमदार राजन साळवी गेल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. साळवी यांच्या पाठोपाठ आमदार भास्कर जाधव हे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. भास्कर जाधव नाराज असल्याचे देखील सांगितले जात होते. पक्षाकडून संधी न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे ते ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात होती.
भास्कर जाधव यांच्या विधानावरून ते पद मिळवण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याची टीका होत होती. त्यावर बोलतान ते म्हणाले, 'मी 43 वर्ष राजकारणात आहे. मी येवढी पदं उपभोगली आहेत. तेव्हा स्टंटबाजी केली नाही तर आत्ता काय करणार. राजकीय जीवनामध्ये कधीही पद मिळवण्यासाठी मी नौटंकी केली नाही, मी कधी रडगाणं गात बसलो नाही. मी कुठल्या पद्धतीने नाटक केले नाही, जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबाने नाही मिळाले तरी माझ्या नशिबाने. नौटंकीपणा मी केली आहे.
मी जे बोललो नाही त्याचा अन्वयर्थ काढला गेला. मी 43 वर्ष राजकारणात आहे. माझ्या क्षमतेने प्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्द प्रयोग आहे. कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही यावर माझा आक्षेप नाही. हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही. तर, अनेकांच्या बाबतीत घडलं. तो दोष मी माझ्याकडे घेतला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नेते बाहेर जात आहेत. त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले. 'जातो त्याला जा म्हणणे हा माझा विचार नाही, हा विचार मानत असताना आपले सहकारी आपल्यासोबत असले पाहिजे ही भूमिका मी मांडली. जर कोणी सोडून जात असेल तर त्यावर पक्षप्रमुख बोलताना जा म्हणणे योग्य.'
भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्यांचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच कारकिर्द उत्तरार्धाला लागलेली मी एक कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगले घडावे यासाठी आपली तळमळ असल्याचे जाधव म्हणाले.त्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबतच कायम राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.