Rajan Patil-Prashant Paricharak-Dhananjay Mahadik
Rajan Patil-Prashant Paricharak-Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhima Sugar Factory Result : पाटील-परिचारक गटाने पराभव स्वीकारला; बाळराजेंची सूचक पोस्ट!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Bhima Sugar Factory) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार पॅनेल विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरीअखेर महाडिक यांच्या पॅनेलने सरासरी २२०० मतांची आघाडी घेतल्यानंतर माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या गटाने आपला पराभव मान्य केला. पाटील-परिचारक पॅनेलचा प्रमुख चेहरा असलेले बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी फेसबुक पोस्ट करत सूचक विधान केले आहे. (Bhima Factory Result : Rajan Patil-Prashant Paricharak group conceded defeat)

बाळराजे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, खोटं बोलून जिंकण्यापेक्षा, खरं बोलून पराभव झालेला बरा...भीमा बचाव परिवर्तन पॅनेलला मतदान करणाऱ्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार... अशा शब्दांत बाळराजे यांनी भीमा कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवाबाबत भाष्य केले आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाडिकांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती, ती पहिल्या फेरीअखेर २२६४ मतांपर्यंत गेली होती.

खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार पॅनेल, तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रचारातही एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे भीमा कारखान्याच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता निर्माण झाली होती.

पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील सुमारे ७५०० मतांची मोजणी झाली. त्यात पंढरपूर तालुक्यातील पुळूज आणि पुळूजवाडी परिसरात महाडिकांना एकतर्फी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या भागात महाडिकांच्या गटाला तब्बल १२६० मतांचे अधिक्य मिळाले आहे, त्यामुळे भीमा कारखान्याच्या निवडणुकीत पुळूज परिसरात महाडिकांसाठी निर्णायक ठरला आहे.

पहिल्या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज, पुळूजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी व तारापूर या केंद्रवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या केंद्रावर झालेल्या मतमोजणीत महाडिकांच्या भीमा परिवार पॅनेलला ५८४१ मते मिळाली आहेत, तर विरोधी राजन पाटील-प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलला ३५७७ च्या आसपास मते मिळाली आहेत. त्यामुळे महाडिकांचा पॅनेल सरासरी २२०० मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) जोरात चालल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT