Bhima Kale case/ Solapur
Bhima Kale case/ Solapur  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भीमा काळे मृत्यू प्रकरण : पोलीस कोठडीत पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी भीमा काळे (Bhima kale death case) याच्या मृत्यूप्रकरणी सात पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमा काळे याच्यावर दरोडा व जबरी चोरीचा आरोप होता. गुन्हे अन्वेषण विभागाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह सात पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. (Solapur Crime news update)

गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी भीमा काळेची तब्येत अचानक खालावली. पोलीस कोठडीत असताना भीमाला सर्दी, ताप, खोकला व उलटया होत असल्याने व दोन्ही पायास संसर्ग झाल्याने त्याचे दोन्ही पाय सुजले होते. त्याला उपचाराकरीता सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये २४ सप्टेंबर ला २०२१ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी उपचारास दाखल केले. रुग्णालयात उपचार चालु असताना आरोपी भिमा काळे याचे ३ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री निधन झाले. त्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाणे त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थेट पोलिसांवर हत्येचा आरोप केला होता. सिद्रामप्पा गजा, पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन उदयसिंह शामराव पाटील, शितलकुमार मारुती कोल्हाळ, श्रीरंग तुकाराम खांडेकर, शिवानंद दत्तात्रय भिमदे, अंबादास बालाजी गड्डुम, अतिश काकासाहेब पाटील, पोना लक्ष्मण पोमु राठोड या सात जणांविरुद्ध आरोपीस वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि कलम ३०४, ३३०, १६६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

भीमा काळे याने आपला गुन्हा मान्य करावा गुन्हयातील चोरीस गेलेला माल काढुन दयावा म्हणून त्यास तपास अधिकारी कोल्हाळ, खांडेकर, भिमदे, गड्डम, पाटील, व राठोड यांनी भीमाला पोलीस कोठडीत मारहाण केली. इतकेच नव्हे तर २२सप्टेंबर २०२१ रोजी रात्री आठ वाजता सुमारास तपास अधिकारी यांनी आरोपी भीमाला त्यांच्या समक्ष हजर केले असता आरोपी हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास आले, आरोपी जखमी असातान आणि त्याला वैदयकीय उपचाराची आवश्यकता असताना सुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच, पोलीस ठाण्यात प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावून सर्व गोष्टी जतन करण्याची आवश्यकता असताना या प्रकारांत प्रगटिकरण कक्षात सीसीटीव्ही नसल्याचं दिसून आले, त्यामुळं पोलिसांनीच पोलिसांच्या विरोधात फिर्याद देत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT