मुंबई : सांगलीतील इस्लामपूरच्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) व ब्राम्हण समाजाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे मिटकरी हे सध्या मनसे आणि ब्राह्मण समाजाच्या निशाणावर आहे. राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन मनसेचे (mns) आमदार राजू पाटील (raju patil) यांनी मिटकरींची खिल्ली उडवली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (MNS on Amol Mitkari)
इस्लामपुरच्या सभेत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख खाज ठाकरे असा केला होता. त्यावर कल्याण येथे बोलताना राजू पाटील यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''मेंटल मिटकरींबाबत काय बोलणार? अशा शब्दात राजू पाटील यांनी मिटकरींची खिल्ली उडवली आहे.
राजू पाटील म्हणाले, ''त्या मेंटल माणसाबद्दल काय बोलायचं, आज शरद पवार यांनी देखील मिटकरी यांच्या वक्तव्या बाबत बोलताना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सांगितलं. मात्र एकूणच तुम्ही तुमच्या गोष्टी वदवायला तुमचं व्यासपीठ उपलब्ध करून देता. मिटकरींनी हे विसरू नये की लोकं मूर्ख नाहीत,''मिटकरी फिटकरी यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आम्हाला लाजल्यासारखं होतं मूर्खांबद्दल काय बोलणार असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
''खाजसाहेब वाढत्या महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेत त्यावर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाइमपास होतो. ते शरद पवार साहेबांविषयी बोलले म्हणून खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात-दोन पाय, डोकं आणि त्यात मेंदूही दिला आहे. पण मेंदू कुणाचा गुलाम ठेवावा याचं भानही दिलंय,''असे अमोल मिटकी इस्लामपुरच्या सभेत बोलले आहेत. त्यानंतर मनसेने आक्रमक झाली आहे.
मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही मिटकरींवर केली आहे. ''राष्ट्रवादीच्या गॅ वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून,ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही.तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?''असे इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
मिटकरीच्या या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टीका केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले, ''आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,''
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारवर गिरीश महाजन यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले, "सत्ताधारी तीनही पक्षांचे तोंड तीन बाजूला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयी राज्य सरकारचे एकमत होत नाही. आतापर्यंत अशी स्थिती राज्याची कधी नव्हती व इतके वाईट दिवस राज्याला कधी आले नाही,'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.