P N Patil, Sampat Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : सडोलीचे राजकीय वैरी 35 वर्षांनी एकत्र आले; आश्चर्याचा धक्का, पण कार्यकर्त्यांना पचले नाही

Bhogavati Sugar Factory Kolhapur P N Patil And Sampat Pawar : नेते आणि राजकारणी पक्ष किंवा आपली भूमिका बदलतात तेव्हा सर्वांत मोठी अडचण होते ती कार्यकर्त्यांची. आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तेच झालं....

Rahul Gadkar

Kolhapur Politics : गेल्या तीन ते चार दशकांपासून एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून विधानसभेच्या मैदानात उत्तरणाऱ्या एकाच गावच्या दोन पाटलांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिलजमाई केली. आमदार पी. एन. पाटील आणि शेकापचे माजी आमदार संपत (बापू) पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधाऱ्यांच्या पाटील गटाला शेकापची साथ मिळाल्याने कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजू भक्कम होताना दिसली. मात्र, शेकापने पाटील गटाशी हात मिळवल्याचे अनेक कार्यकर्त्यांना पसंत पडले नाही. शेकापमध्ये उभी फूट पडून परिवर्तन आघाडीला जाऊन मिळाली, तर धैर्यशील पाटील यांनीदेखील तिसरी आघाडी स्थापन करून गेल्या दोन महिन्यांपासून बिनविरोधी करण्याच्या हालचालीला सुरुंग लावला आहे.

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत तीन आघाड्या आकारास आल्या. ‘शेकाप’मध्ये उभी फूट पडली आहे. शेकापचे माजी आमदार संपत पवार यांचे निकटवर्तीय बाबासाहेब देवकर यांनी मोठा गट घेऊन त्यांच्या आघाडीतून बाहेर पडले आहेत. परिवर्तन आघाडीला मिळाल्याने सत्ताधारी गटाला पहिला हदरा दिला आहे. ( Maharashtra Politics Latest News )

दुसरीकडे विरोधात काँग्रेसचा चरापले गट, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना यांची परिवर्तन आघाडी, तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला मत विभाजनाचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.

या निवडणुकीमध्ये कारखाना डबघाईला आल्याच्या कारणावरून बिनविरोधची भाषा पहिल्यापासूनच केली गेली. मात्र, बिनविरोधच्या अडून राजकारण तापले आणि त्याचे रूपांतर तीन आघाड्यांमध्ये झाले. दोन दिवसांपूर्वी विद्यमान अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे सर्व शेकापक्ष घेऊन सहभागी झाल्याची घोषणा ए. वाय. पाटील यांच्या साक्षीने झाली.

माघारीच्या दिवशी मोठ्या घडामोडी

माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी पक्षाला बळ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षात उभी फूट पडली. त्यातील एक मोठा गट परिवर्तन आघाडीला मिळाला, तर काहीजण धैर्यशील पाटील यांच्या गोटात सामील झाले. स्वाभिमानी पक्ष आणि चरापले यांच्याबरोबर हात मिळवणी केलेल्या भाजपचे एक उमेदवार धैर्यशील पाटील यांच्याकडे गेले, तर ‘शेकाप’ने तिन्ही आघाड्यांमध्ये वर्णी लावून घेतली आहे. काँग्रेसचीही स्थिती तीच आहे. बलाढ्य सत्ताधारी गट आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली असतानाच उर्वरित दोन्ही गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिसतात. ( Kolhapur Politics Latest News )

आमदार पाटील यांचे पुतणे विक्रांतसिंह पाटील हे परिवर्तन आघाडीमध्ये आहेत. धैर्यशील पाटील यांच्या आघाडीत काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. राष्ट्रवादीचेही अनेक उमेदवार तीन्ही आघाड्यांमध्ये आहेत. फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमान जपून एकाच आघाडीमध्ये सहभागी झाली आहे. विरोधात गेले काही दिवस व्यूहरचना करणारे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे फुटीचे वातावरण बघून अचानक आमदार पाटील यांच्या पंक्तीला जाऊन बसले. त्यामुळे त्यांना काहीसे बळ निर्माण झाल्याचे दिसते.

डोंगळे, पाटील सत्ताधाऱ्यांसोबत

गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी भोगावती कारखान्यातील सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेदेखील सत्ताधारी पाटील गटाबरोबर असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT