Hasan Mushrif News : शाळेचा मित्रही मदतीला येईना...; मंत्री मुश्रीफांचा 'तो' सवंगडी मारतोय 18 वर्षे सरकार दरबारी हेलपाटे

Kagal Political News : मित्राकडून तरी आपल्याला न्याय मिळेल अशी भाबडी आशा घेऊन...
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Latest News : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लोकशाही दिन नुकताच पार पडला. या लोकशाही दिनात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः तीन तास टेबलवर बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली, पण या लोकशाही दिनात एक चेहरा असा होता जो पुटपुटत बाहेर आला. "हे सरकार काय कामाचं न्हाय, नुसतं हेलपाटं मारण्याशिवाय काम न्हाय, माझ्याबरोबर शिकलेला मंत्री बी कामाचा न्हाय' असं म्हणत आपली खंत व्यक्त करू लागला.

कागल तालुक्यातील मौजे सांगामधील बंडू पाटील हे गृहस्थ आहेत. त्यांच्या शेतीच्या जमिनीत फेरफार झाली आहे. गेल्या 18 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी कार्यालयाच्या बाहेरच बसून मोठ्याने खंत व्यक्त करायला सुरुवात केली. मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे त्यांच्याबरोबर शाळेत शिकायला असल्याचा दावा करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif
Chhagan Bhujbal On Reservation : ओबीसी आरक्षणविरोधात याचिका; स्वत: भुजबळ उतरणार मैदानात...

मित्राकडून तर आपल्याला न्याय मिळेल, अशी भाबडी आशा घेऊन ते लोकशाही दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांच्या जवळून लवकर बाजूला केल्याने आपण त्यांचे मित्र आहोत हे बोलण्याचा वेळही त्यांना मिळाला नाही.(Kolhapur Politics)

नेमके प्रकरण काय?

बंडू पाटील यांची मौजे सांगामध्ये 22 गुंठे जमीन आहे. 2006 साली शासकीय घोळामुळे त्यांची 22 गुंठे जमीन शिवाजी यशवंत खुळे-पाटील यांच्या नावावर झाली. पाटील यांची 18 गुंठे जमीन बंडू पाटील यांच्या नावावर झाली. बंडू पाटील यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी 2006 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करत आहेत. (Latest Marathi News )

मागील ऑक्टोबर महिन्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या जमिनीची पाहणी केली आहे. मात्र, त्यांची मूळ जमीन आपल्या नावावर व्हावी यासाठी बंडू पाटील या वेळीदेखील लोकशाही दिनात सहभागी झाले होते.

मित्राकडून न्याय मिळेल ही आशा...

मंत्री मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील गोरगरिबांची अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. गेल्या 26 वर्षांपासून बंडू पाटील हे शासनाचे हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांची ही व्यथा ऐकायला कोणी तयार नाही. आपल्या शालेय मित्राकडून तरी आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा बंडू पाटील यांना आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Hasan Mushrif
PM Modi On OBC : महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद पेटलेला असताना PM मोदींचं मोठं वक्तव्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com