Satara, 22 June : कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. २१ जून) चुरशीने ८२.२६ टक्के मतदान झाले. त्याची मतमोजणी उद्या (ता. २३ जून) होणार आहे. ‘एक्झिट पोल’नुसार सत्ताधारी भोसले गटाचा जयवंतराव भोसले सहकार पॅनेल 68 ते 72 टक्के मते घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे कृष्णा कारखाना पुन्हा एकदा सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्याकडे येणार असल्याचे मानले जात आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, तर विरोधात आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलमध्ये थेट लढत झाली.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलकडून चुरशीने प्रचार करण्यात आला होता, त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 153 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत चुरशीने ८२.२६ टक्के मतदान झाले होते, त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृष्णा कारखान्याची उद्या (ता. २३ जून) मतमोजणी आहे, त्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेले असताना ‘पोल पंडीत’ या संस्थेचा कृष्णा कारखाना निवडणुकीच्या निकालाबाबतचा ‘एक्झिट पोल’ पुढे आला आहे. त्यानुसार सत्ताधारी भोसले गटाची सत्ता पुन्हा कृष्णा कारखान्यावर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘पोल पंडित’च्या एक्झिट पोलनुसार जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला तब्बल 68 ते 72 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पॅनेलला सुमारे 24,500 ते 25,500 मते मिळू शकतात, असेही पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला 28 ते 32 टक्के मते मिळण्याची शक्यता ‘पोल पंडीत’च्या पोलमध्ये व्यक्त केली आहे. या पॅनेलला सुमारे 9,800 ते 10,800 मते मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सुमारे 14,000 ते 14500 च्या मताधिक्याने पुन्हा विजयी होऊ शकतो, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
गटनिहाय दोन्ही पॅनेलला मिळणाऱ्या मतांचा अंदाज (‘पोल पंडीत’चा एक्झिट पोल)
सहकार पॅनेल.....संस्थापक पॅनेल
1 रेठरे हरणाक्ष-बोरगाव-ईश्वरपूर.... 65 टक्के........... 35 टक्के
2नेर्ले-तांबवे-वाठार गट................... 63 टक्के........... 37 टक्के
3 येडेमच्छिंद्र-वांगी-देवराष्ट्रे.............. 72 टक्के............ 28 टक्के
4 काले-कार्वे गट............................ 78 टक्के............ 22 टक्के
5 रेठरे बुद्रूक - शेणोली- शेरे ............79 टक्के.............. 21 टक्के
6 वडगाव हवेली-दुशेरे गट.............. 71 टक्के.............. 29 टक्के
एकूण..........................................71 टक्के................. 29 टक्के
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.