Karad, 23 June : अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने विजय मिळवला, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी ५० हजारांवर सभासद संख्या असलेल्या कृष्णा करखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कऱ्हाड, वाळवा, कडेगाव व खानापूर या तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखाना कार्यक्षेत्रातून पाच आमदार निवडून येतात. त्यामुळे कृष्णा कारखान्याची निवडणूक दरवेळी अत्यंत चुरशीची होते. एवढ्या मोठ्या परिघातील या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा मिळविलेला हा विजय ऐतिहासिक विजय मानला जात आहे.
कृष्णा कारखान्याच्या आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत एवढी आघाडी कधीही मिळालेली नव्हती. एवढे भरघोस ऐतिहासिक मताधिक्य डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने मिळविले आहे.
उमेदवारांना मिळेलेली मते ः
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली - दुशेरे) :
धोंडीराम जाधव (दुशेरे) - 24868
जगदीश जगताप (वडगाव हवेली) - 23768
आनंद खबाले (विंग) - 24108
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे - काले) :
अरविंद पाटील (आटके) - 24851
दयाराम पाटील (काळे) - 24108
बाजीराव थोरात (काले) - 23475
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे - नेर्ले) :
दत्तात्रय देसाई (वाठार) - 24678
लिंबाजी पाटील (तांबवे, वाळवा) - 24044
संभाजीराव पाटील (नेर्ले, वाळवा) - 23963
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव - रेठरे हरणाक्ष) :
जयवंत मोरे (रेठरे हरणाक्ष) - 24639
सत्यजित पाटील (बोरगाव) - 24040
सुनील पाटील (कामेरी) - 23957
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र - वांगी) :
संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र) - 24172
बाबासो शिंदे (देवराष्ट्रे) - 22953
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक - शेणोली) :
सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक) - 24809
बाजीराव निकम (शेरे) - 21925
महिला राखीव गट :
सुजाता जाधव (कापील) - 23479
सुनीता शेवाळे (सवादे) - 21874
अनुसूचित जाती-जमाती राखीव गट :
छबन कांबळे (कोळे) - 24658
भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष राखीव गट :
अविनाश खरात (खरतवाडी) - 24515
इतर मागास प्रवर्ग राखीव गट :
बाळासो जगताप (कोडोली) - 25010
संस्थापक पॅनलचे उमेदवार :
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली - दुशेरे) :
आनंदा तुकाराम जगताप - 10208
प्रताप धोंडीराम जगताप - 10048
दुर्योधन पांडुरंग खबाले - 9437
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे - काले) :
संतोष नागनाथ पाटील - 10022
प्रतापराव वसंतराव पाटील - 10363
शांताराम शंकर पाटील - 9802
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे - नेर्ले) :
सुरेश / सुभाष बाबुराव पाटील - 9944
सुभाष उद्धव पाटील - 10317
किरण दिलीप पाटील - 10089
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव - रेठरे हरणाक्ष) :
जयकर शिवाजी शिंदे - 9925
महेश अशोकराव पाटील - 10116
उदयसिंह प्रतापराव शिंदे - 9819
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र - वांगी) :
माणिकराव आनंदराव मोरे - 10194
सुरेश गणपती पाटील - 10060
सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक - शेणोली) :
अविनाश जगनाथ मोहिते - 11456
दीपक रामचंद्र (धोंडी) कणसे - 9677
महिला राखीव गट :
अर्चना अविनाश मोहिते - 11896
विजया उत्तमराव पाटील - 10217
अनुसूचित जाती-जमाती राखीव गट :
सुधीर गोविंद रोकडे - 10599
भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष राखीव गट :
दिलीप तुकाराम गलांडे - 10561
इतर मागास प्रवर्ग राखीव गट :
प्रकाश बाळकृष्ण श्रीखंडे - 10276
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.