

Karad, 23 June : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २३ जून) सकाळी आठपासून सुरू झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलचे उमेदवार सरासरी 7500 मतांनी आघाडीवर असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, अद्याप पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
दरम्यान, सहकार पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मतांची आघाडी पाहून भोसले गटाच्या समर्थकांनी गुलालच्या उधळणीत जल्लोष सुरू केला आहे.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जयवंतराव भोसले सरकार पॅनल व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेल यामध्ये लढत झाली होती.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता. २१ जून) चुरशीने ८२.२६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सभासद विद्यमान सत्ताधारी पॅनेलला संधी देतात की विरोधकांच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात आज सकाळी आठपासून निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत सुरू झाली. ही मतमोजणी ७६ टेबलवर ३५० कर्मचारी करत आहेत.
पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने सरासरी ७५०० मतांची आघाडी घेतल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.