Satara, 02 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी नेमण्याचा ठरावाची सध्या जिल्ह्यात धांदल सुरू आहे. ठराव आपल्या बाजूने व्हावा, यासाठी अनेक ठिकाणी बाचाबाची आणि भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत. काही ठिकाणी वादविवाद नको म्हणून ठरावासाठी बोली लावण्याचे प्रकार घडत आहेत. मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा मानला जातो. मात्र, त्यासाठीच बोली लावण्याची घटना सातारा जिल्ह्याच्या कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथे घडली आहे.
कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीने संस्थेला आर्थिक मदत करणाऱ्या सभासदाला ठराव देण्यासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लिलाव प्रक्रिया राबविली. त्या लिलावात सभासद विक्रमसिंह जगताप यांनी दोन लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. जगताप यांची बोली सर्वाधिक असल्याने त्यांनी सोसायटीला दोन लाखांच्या मदतीचा धनादेश देऊन बहुमताने ठराव घेतला.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानासाठी ठराव घेण्यासाठी कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीला जिल्हा बँकेकडून पत्र मिळाले होते. त्यानंतर सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सोसायटीस भरीव आर्थिक मदत देणाऱ्या सभासदाच्या नावाचा ठराव घेण्याचे ठरले.
सोसायटीच्या विकासासाठी जो सभासद राजकीय स्वहित आडवे न आणता भरीव आर्थिक मदत देईल, त्यालाच ठराव देण्यासाठी सर्व सभासदांना आवाहनही करण्यात आले होते. त्यानुसार सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत लिलावाची बोली एक लाख रुपयाने सुरू झाली. विक्रमसिंह जगताप आणि आनंदराव तुकाराम जगताप यांनी सहभागी होत बोली बोलायला सुरुवात केली.
बोलीतील रक्कमेची चढाओढ होऊन विक्रमसिंह जगताप यांनी सर्वाधिक दोन लाख रुपयांची बोली लावली. त्यावर मोहोर उठवत कोडोली सोसायटीत जगताप यांच्या नावाचा ठराव झाला. त्या रक्कमेचा धनादेशही त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केला. यानंतर विक्रमसिंह जगताप आणि आनंदराव जगताप यांचे संचालक मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. सर्वाधिक बोली लावणारे विक्रमसिंह जगताप यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्वाधिक दोन लाखांची बोली लावणारे विक्रमसिंह जगताप यांनी या प्रक्रियेचे समर्थन केले आहे. सोसायटीच्या विकासाच्या कार्यास माझा हातभार लागावा आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखत मी या मार्गाने ठराव घेतला आहे. संस्थेची भविष्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.