Satara DCC Bank : बाचाबाची होऊनही भाजप मंत्र्याने मारली बाजी : जावळीतील बहुतांश सोसायट्यांचे जिल्हा बॅंकेसाठी ठराव पूर्ण

Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखाडे सोसायटीचा ठराव शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या बाजूने झाला. मंत्री स्वतः उपस्थित राहिल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde
Shivendraraje Bhosale Vs Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 01 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जावळीत सुरु झालेला राजकीय संघर्ष आखाडे सोसायटी ठरावाच्या वेळी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. किरकोळ बाचाबाची वगळता बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले गटाच्या संचालक उषा सुरेशराव शिंदे यांनी ठराव आपल्या बाजूने करण्यात बाजी मारली. ठरावावेळी स्वतः मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे आखाडे येथे उपस्थित होते.

सातारा जिल्हा बँकेच्या ठरावावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे समर्थकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजूकडून संचालक पळवापळवी तसेच दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मतदानासाठी जावळी तालुक्यातील बहुतांश सोसायट्यांच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता फक्त तीन सोसायट्यांचे ठराव होणे बाकी आहेत.

आखाडे येथील श्रीराम सेवा सोसायटीची ठरावासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी आलेवाडी सोसायटी ठरावावेळी दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे मोठा राजकीय राडा झाल्याने पोलिस अलर्ट मोडवर होती. आखाडे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde
Daund Crime : पडळकर, संग्राम जगताप, लांडगेंना धमकावणारा माजी नगराध्यक्ष पुन्हा गोत्यात : तरुणीच्या अपहरणाचा नवा गुन्हा दाखल

पोलिस बंदोबस्तामध्ये सकाळी दहा वाजता सोसायटी संचालकांच्या बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह समर्थक संचालक उषा सुरेशराव शिंदे आणि शशिकांत शिंदे समर्थक आणि विद्यमान अध्यक्ष राजेंद्र संपतराव शिदे यांच्यात ठरावासाठीचा विषय घेण्यात आला.

Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde
Satara Politic's : पाटणमध्ये सातारा ZPची पुनरावृत्ती : बहुमत असूनही पाटणकरांचा शंभूराज देसाईंना दे धक्का!

शिवेंद्रराजे गटाच्या उषा शिंदे यांच्या बाजूने आवाजी मतदानात सहाजणांनी समर्थन दिल्याने त्यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com